ईकेवायसी  File Photo
परभणी

परभणी : ईकेवायसी करुनही शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे अनुदान मिळेना

प्रशासन नेमके करते काय? शेतकऱ्यांचा प्रश्न

सोनाली जाधव

ताडकळस प्रतिनिधी; ताडकळस व परीसरातील शेतकऱ्यांनी ईकेवायसी करुनही अतिवृष्टीचे अनुदान मिळालेले नाही. ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केली ते शेतकरी बँकेत चकरा मारत असुन, हैराण आहेत.

ईकेवायसी करुनही अनुदान मिळेना

ताडकळस व परीसरातील शेतकऱ्यांनी ईकेवायसी केली आहे. अद्याप त्यांना अतिवृष्टीचे अनुदान मिळालेले नाही. शेतकरी बँकेत चकरा मारत आहे अनुदानपेक्षा जास्त खर्च येण्या-जाण्यात शेतकऱ्यांचा जात आहे. यापूर्वी निवडणूकचे कारण सांगितले जात होते. त्यानंतर शेतकरी कागदपत्रे देत नाही, असे सांगितले जात आहे.

अप्रत्यक्षात महसुल विभागाचे कर्मचारी कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांवर आरोप करत आहेत तर कृषी विभागाचे कर्मचारी महसुल विभागाच्या कर्मचाऱ्यांच्यावर ढकलाढकली करत असल्याचे सांगितले जात आहे.

प्रशासन नेमके काय करतेॽ

अतिवृष्टीमुळे ताडकळस, कळगाव, धानोरा काळे, बानेगाव, महागाव मुंबर, कळगाववाडी, फुलकळस, मजलापुर, कमलापुर, खंडाळा, माखणी, खाबेगाव, एकरुखा, निळा, सिरकळस, बलसा बु, महातपुरी, माहेर, शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या तोंडावर अनुदान मिळाले असते तर, बि-बियाणे, शेतीसाठी लागणारे साहीत्य घेता आले असते. ईकेवायसी करुनही अद्याप अनुदान शेतकऱ्यांना मिळत नसल्याने, प्रशासन नेमके करत आहे तरी कायॽ असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. ईकेवायसी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम पडावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT