कावलगाव वाडी (ता.पूर्णा) येथे ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर अडवून चाकातील हवा सोडण्यात आली.  Pudhari Photo
परभणी

परभणी: जमिनीच्या वादातून उसाचा ट्रॅक्टर अडवून शेतकऱ्याला लोखंडी रॉडने मारहाण

Parbhani Crime News | पूर्णा तालुक्यातील कावलगाव वाडी येथील घटना

पुढारी वृत्तसेवा

पूर्णा, पुढारी वृत्तसेवा: कावलगाव वाडी (ता.पूर्णा) येथे ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर अडवून एका शेतकऱ्याला चार जणांनी लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. त्यानंतर जिवे मारण्याची धमकी देत ट्रॅक्टर हेडची मोडतोड करुन चाकातील हवा सोडून दिली. या प्रकरणी चुडावा पोलीस ठाण्यात चार जणां विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Parbhani Crime News)

याबाबत अधिक माहिती अशी की, कावलगाव वाडी येथील फिर्यादी शेतकरी प्रकाश किशनराव शेळके (वय ४२) हे त्यांचा पुतण्या बालाजी शेळके यांच्यासोबत ट्रॅक्टरमधून ऊस वाहतूक करत होते. धानोरा मोत्या गावाकडे जाणा-या रोडवर भवानी मातेच्या मंदिरा जवळ येताच गावातील भावकीचे दंडेलशाही करणारे रामदास एकनाथ शेळके, गिरधारी परसराम शेळके, नरहरी नागोराव शेळके, परसराम नागोराव शेळके यांनी संगनमत करुन फिर्यादी प्रकाश शेळके व त्यांचे पुतणे बालाजी शेळके यांना ट्रॅक्टरमधून खाली उतरवून शेतजमिनीबाबत कोर्टात चालू असलेला वाद मिटवून घे, नाहीतर तूला जिवेमारुन टाकतो, अशी धमकी देऊन लोखंडी रॉडने मारहाण केली.

या प्रकरणी शेतकरी प्रकाश शेळके यांच्या फिर्यादीवरून चुडावा पोलिस ठाण्यात रामदास शेळके, गिरधारी शेळके, नरहरी शेळके, परसराम शेळके यांच्याविरुद्ध विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT