ekurkha farmers hunger strike  Pudhari Photo
परभणी

Parbhani ekurkha farmers hunger strike|एकुरखा येथील उपोषणकर्त्या शेतकऱ्यांची चौथ्या दिवशी प्रकृती खालावली

ekurkha farmers hunger strike - बुधवारी पाणी सोडण्याचे अभियंत्याचे लेखी आश्वासन, शेवटच्या भागात पाणी येईपर्यंत उपोषण सुरूच राहणार -आप्पासाहेब तांबे

पुढारी वृत्तसेवा

ताडकळस : जायकवाडी धरणाच्या बि 70 कालव्या वरील एकुरखा, खाबेगाव, महातपुरी, हटकरवाडी, कानडखेड या परिसरातील शेतकऱ्यांना अद्याप कालव्याचे पाणी मिळाल्या नसल्यामुळे शेतकऱ्यांत जलसंपदा विभागाच्या गलथान कारभाराचा संताप व्यक्त होत आहे. एकीकडे दुष्काळाने शेतकरी होरपळत असताना त्यात भरीतभर जायकवाडीचे पाणी मिळाले नसल्याने पाण्याअभावी शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे.

शेतकरी उभे पीक वाचविण्यासाठी धडपड करत आहेत. ऊस, हळद, कापूस, तुर, ज्वारी, गहू, हरभरा वाळत आहेत. याप्रकरणी गेल्या ३ दिवसांपासून एकुरखा येथील जलसंपदा विभागाच्या शाखा क्रं 23 समोर आप्पासाहेब उत्तमराव तांबे हे बेमुदत उपोषणाला बसले आहेत. सोमवार रोजी उपोषणाचा चौथ्या दिवसी आप्पासाहेब तांबे, यांची प्रकृती खालावली असून ताडकळस येथील समुदाय वैद्यकीय अधिकारी डॉ. अतुल शिंदे यांनी त्यांची तपासणी केली असता रक्तदाब वाढल्याचे व अशक्तपणा जाणवत असल्याचे स्पष्ट झाले.

दरम्यान जलसंपदा विभागांचे सब डिवीजन क्रं 10 चे उपकार्यकारी अभियंता हर्षल कुकर, कालवा निरीक्षक सदगिर, कर्मचारी यांनी उपोषणस्थळी भेट देऊन बुधवार 25 नोव्हेंबर रोजी पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन दिले. मात्र कालव्यात पाणी येईपर्यंत उपोषण सुरू राहणार असल्याचे शेतकऱ्यांनी निर्धार व्यक्त केला. दरम्यान रास्तारोको ताडकळस पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप यांच्या मध्यस्थीने स्थगित करण्यात आले.

मंगळवार पर्यंत कालव्याचे पाणी शेवटच्या भागातील शेतकऱ्यांच्या शेतीला न मिळाल्यास पुन्हा रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. आतापर्यंत उपोषणस्थळी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख विशाल कदम, भाजपचे गंगाखेड विधानसभा प्रमुख तथा ताडकळस कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बालाजी रुद्रवार, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस रुषिकेश सकनुर, ताडकळसचे सरपंच तथा माजी जिल्हा परिषद सदस्य गजानन आंबोरे, पुर्णा पंचायत समितीचे सदस्य ज्ञानोबा घोडके, शिवसेना शिंदे गटाचे पुर्णा तालुका प्रमुख व्यंकटराव पौळ, पुर्णा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष संतोष एकलारे, भाजपचे ज्येष्ठ नेते लिबाजीराव भोसले, ताडकळस कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक तथा ग्राम पंचायत सदस्य दिलीप आंबोरे, मारोती मोहिते,नरहारी रुद्रवार, पुर्णा तालुक्यातील आदी लोकप्रतिनिधींनी उपोषण स्थळी भेट देऊन उपोषणाला पाठींबा दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT