परभणी

परभणी: इसाद येथील पोलीस अंमलदार देवानंद भालेराव यांचे निधन

अविनाश सुतार

गंगाखेड, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील इसाद येथील रहिवासी तथा चारठाणा पोलीस ठाण्यात अंमलदार पदावर कार्यरत देवानंद दत्तराव भालेराव (वय ४१) यांचे आज (दि.१०) सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. सायंकाळी ५ वाजता त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मागील १३ वर्षांपासून ते पोलीस दलात कार्यरत होते.

मागील १५ दिवसांपासून देवानंद भालेराव यांच्यावर औरंगाबाद येथे एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारदरम्यान त्यांचे आज सकाळी निधन झाले. इसाद येथे त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. परभणी पोलीस मुख्यालयाच्या पोलिसांनी त्यांच्या पार्थिवाला मानवंदना दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासर्गीय सूतगिरणीचे चेअरमन डॉ. सिद्धार्थ भालेराव, इसादचे सरपंच अनिल सातपुते, ॲड. महावीरराजे भालेराव, प्रमोद साळवे, उत्तम भाग्यवंत आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते. त्यांच्या पश्चात आई-वडील पत्नी, एक मुलगा, एक मुलगी व दोन भाऊ असा परिवार आहे.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT