Parbhani Crime youth murder in nandkheda
परभणी - तालुक्यातील नांदखेडा येथे माझ्या भावाला शिवीगाळ का करतो? या कारणावरून दोन गटांत उफाळलेल्या वादाचे पर्यवसान एका तरुणाच्या खुनात झाले असून तिघे गंभीर जखमी झाले. ही घटना सोमवारी (दि.१) रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी परस्पर विर ोधी तक्रारींवरून ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले.
शंकर पंढरीनाथ अब्दागिरे यांच्या तक्रारीनुसार तु माझ्या भावाला शिवीगाळ करून धमकी का देतो? असा जाब विचारल्यावर लखन सुरेश जाधव व सहकार्यांनी संगनमताने हल्ला केला. यात अर्जुन पंढरीनाथ अब्दागिरे (वय २०) याच्यावर लोखंडी
रॉड, चाकू व लाथाबुक्क्यांनी प्राणघातक हल्ला करण्यात आला. त्याच्या पायावर चाकू खुपसल्यामुळे गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणात लखन सुरेश जाधव, शाम सुरेश जाधव, रमेश तुकाराम जाधव, रोहन उर्फ सिध्दार्थ रमेश जाधव, सुरेश तुकाराम जाधव, राम सुरेश जाधव व अशोक सुरेश जाधव यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान याच घटनेप्रकरणी दुसरी तक्रार राम सुरेश जाधव यांनी दिली असून शंकर अब्दागिरे, अर्जुन अब्दागिरे (मृत), पंढरी अब्दागिरे आणि एका अल्पवयीन मुलाने त्यांच्यावर आणि त्यांच्या भावांवर चाकूने हल्ला केल्याचा आरोप केला. या हल्ल्यात
लखन जाधव याच्या पोटावर, छातीवर, पाठीवर वार करण्यात आले. अशोक, सुरेश व रमेश जाधव हे तिघेही गंभीर जखमी आहेत. या खुनाच्या प्रकरणातील सात आरोपींपैकी तिघांना पोलिसांनी अटक केली असून तिघे गंभीर जखमी आहेत व त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुसऱ्या बाजूच्या तक्रारीवरून दाखल गुन्ह्यातील चार आरोपींपैकी तिघांना अटक करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुंजाळ, उपविभागीय अधिकारी चंद्रसेन देशमुख, स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व ग्रामीण ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. तपास पोउपनि. गडदे हे करीत आहेत.