Parbhani crime news 
परभणी

Parbhani crime news: ताडकळसजवळ पांदण रस्त्यावर पोलिसांची धाड; पावणेसात लाखांचा अवैध गुटखा व कार जप्त

या प्रकरणी ताडकळस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

पुढारी वृत्तसेवा

ताडकळस: ताडकळस जवळच्या खडाळा (ता. पूर्णा) गावाच्या अलीकडे असलेल्या पांदण रस्त्यावर १५ ऑगस्ट रोजी रात्री साडेबारा वाजता कारवाई करण्यात आली. पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार स्थागुशा पोलीस पथकाने येथे सापळा रचला होता. पोलिसांनी एका संशयित कारला थांबवून तिची झाडाझडती घेतली. यावेळी गाडीमध्ये प्रतिबंधित असलेला मोठ्या प्रमाणावर अवैध गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले.

जप्त केलेल्या मुद्देमालाचा तपशील

  • १,३०,६८० रुपये किंमतीचे केसरयुक्त विमल पानमसालाचे ६६० पुडे.

  • १३,७२८ रुपये किंमतीचे व्ही-१ तंबाखू किंग पॅक असलेले ६२४ पुडे.

  • ६७,५०० रुपये किंमतीचा राजनिवास सुगंधित पान मसाला असलेले ४५० पुडे आणि जाफरानी जर्दा तंबाखू.

  • तस्करीसाठी वापरली जाणारी विनानंबरची सुमारे ४ लाख रुपये किंमतीची जुनी सिल्व्हर रंगाची कार.

असा एकूण ६,७९,४०८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

वाहनचालक पसार, पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी

पोलिसांचे पथक पाहताच संधी साधून वाहनचालकाने अंधाराचा फायदा घेत तिथून पळ काढला. या प्रकरणी ताडकळस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखा (स्थागुशा) आणि परभणी ग्रामीण पोलीस पथकाचे एपीआय जायभाये व गजेंद्र सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार दीपक मुदीराज, यशवंत वाघमारे, रवी जाधव, नामदेव धोत्रे आणि शरद सावंत यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT