Parbhani Charthana thefts  
परभणी

Parbhani Charthana thefts - चारठाणा येथे एकाच रात्रीत पाच ठिकाणी चोऱ्या, भीतीचे वातावरण

परभणी- चारठाणा येथे एकाच रात्रीत पाच ठिकाणी चोऱ्या, भीतीचे वातावरण

पुढारी वृत्तसेवा

चारठाणा : शहरातील मातंग मोहल्ला, आतार मोहल्ला व कुरेशी मोहल्यात दि. 1 ऑक्टोबरच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी चोऱ्या केल्या. प्रत्येक घरातील कुलूप तोडून सोन्या चांदीचे दागिने व रोख रकमेचे एकूण अंदाजे 2,75,000 रुपयांचे मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना याठिकाणी घडली. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

याबाबत अधिक माहिती, आशिकी चारठाणा येथील नागरिक दुष्काळाच्या छायेत सापडले आहे. त्यांच्यावर पुन्हा दुसरे चोरीचे संकट पुढे आले आहे. दि. 1 ऑक्टोबर गुरुवारच्या मध्यरात्री कसबा विभागातील मुसक्कीन बुढन कुरेशी यांच्या घराचे कुलूप तोडून कपाटातील नगदी रोख अंदाजे दीड लाख रुपये लंपास केले. तर कसबा विभागातील माधव गिराम यांच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने आत प्रवेश करून कपाट व सर्व साहित्याची झडती घेऊन अंदाजे दहा ते पंधरा हजार रुपये नगदी रोख चोरून नेले. चोरटे इथेच न थांबता कसबा विभागात आपला मोर्चा वळविला.

मातंग गल्लीतील ग्रामपंचायत सदस्य गणेश पारवे यांच्या घराचे कुलूप तोडून कपाटाची झडती घेऊन कपाटा मधील मधील नगदी रोख पन्नास हजार रुपये चोरून नेले. तर शेख बाबू शेख गणी हे घराला कुलूप लावून ऊस तोडीला गेले होते. यावेळी अज्ञात चोरट्याने याचा फायदा घेत त्यांच्या घरातील मुलीचे सोन्या चांदीचे दागिने चोरून नेले.

जितेश जाधव यांच्या घरातील दाराचे कुलूप तोडून आत प्रवेश करून कपाट व सर्व साहित्याची झाडाझडती घेतली. कपाटा मधील अंदाजे नगदी रोख 65 हजार रुपये व सोन्याचे दोन अंगठ्या, सोन्याची बोरमाळ एक तोळ्याची, सोन्याची गहू पोत एक तोळ्याची अज्ञात चोरट्याने पळविल्याची घटना दुसऱ्या दिवशी सकाळी उघड झाली.

या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच चारठाणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी पुंड, बीट जमदार उद्धव सातपुते यांनी चोरी झालेल्या घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. चोरीच्या घटनास्थळी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. तसेच फिंगरप्रिंट तपासणीसाठी बोलावण्यात आले होते.

विशेष म्हणजे कोरडा दुष्काळ पडल्यामुळे नागरिक अडचणीत होते आणि त्यातच चोरीच्या घटनांनी भयभीत केले आहे. त्यामुळे पोलिसांसमोर एक मोठे आव्हान उभे राहिले आहे. दरम्यान पोलिसांनी या अज्ञात चोऱ्याची तात्काळ दाखल घेऊन रात्रीची गस्त घालून गावातील नागरिकांना धीर द्यावा अशी मागणी पुढे येत आहे. अज्ञात चोरट्यांनी नगदी रोख 2 लाख 75 हजार रुपये व सोन्या चांदीचे दागिने असा एकूण मुद्देमाल लंपास केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT