Bori lake overflow
बोरी: काही दिवसांपूर्वी बोरी येथील तलावाचे पाणी नामदेव नगर भागातील नागरिकांच्या घरांमध्ये घुसून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. याची दखल घेत मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांनी बोरी येथे गुरूवारी (दि.२५) सायंकाळी सहा वाजता घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
बोरी येथे दि. १४ सप्टेंबर रोजी मुसळधार पाऊस झाल्यामुळे नामदेव नगर जवळील तलाव तुडुंब पाण्याने भरून ओव्हरफ्लो झाला होता. या परिसरातील चारशे ते साडेचारशे नागरिकांच्या घरांमध्ये पाणी घुसून नागरिकांचे संसार उपयोगी साहित्य व धान्य, कपडे वाहून गेले होते. या ठिकाणी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अजय चौधरी यांनी भेट देऊन पाहणी करून शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी केली होती.
त्यानुसार मंत्री पाटील यांनी त्या नांफेवनगर भागामध्ये भेट देऊन तलावाची पाहणी करून व येथील ग्रामस्थांचे म्हणणे ऐकले.यापुढे अशी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून तलावातून सांडवा काढण्याचे काम संबंधित विभागाने प्रस्ताव तयार करण्याचे त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. तसेच साडेचारशे घरांचे कुटुंबाला नुकसान झालेल्या आठ दिवसांत मदत देण्याचे जिल्हाधिकारी यांना सूचना दिल्या.
यावेळी माजी आमदार विजय भांबळे, जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अजय चौधरी, माजी सभापती अशोकराव चौधरी लक्ष्मण बुधवंत, केशव बुधवंत, माजी उपसरपंच शेख रफिक, लघु पाटबंधारे विभागाच्या अधीक्षक अभियंता सुपेकर, महावितरण चे कनिष्ठ अभियंता शहाणे ग्राम विस्तार अधिकारी एस. व्ही. ढोणे, ग्रामपंचायत अधिकारी विनायक पुंड, तलाठी गणेश शिंदे, मंडळ अधिकारी साखरे, कृषी सहाय्यक प्रणिता वैद्य तसेच ग्रामपंचायत सदस्य प्रशासकीय अधिकारी ग्रामपंचायत कर्मचारी आदी उपस्थित होते.
बोरी पोलिसांच्या वतीने ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुनील गोपीनवार पोलीस उपनिरीक्षक एस. एन. थोरवे, महादेव गायकवाड यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.