परभणीत ऑटो चालकाचा धारदार शस्त्राने खून Pudhari Photo
परभणी

Parbhani crime : परभणीत ऑटो चालकाचा धारदार शस्त्राने खून

परिसरात भीतीचे वातावरण

पुढारी वृत्तसेवा

परभणी : शहरातील नांदखेडा रोडवरील सोमनाथ नगर कमानीमागे शनिवारी (दि. 14) दुपारी एका ऑटो चालकाची अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या केली. सय्यद अकबर सय्यद गफूर (वय 42, रा. पाकिजा मोहल्ला, जिंतूर रोड) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने सय्यद अकबर यांच्या गळ्यावर, पाठीवर आणि मनगटावर धारदार शस्त्राने गंभीर वार केले. हल्ल्यानंतर अकबर रक्तबंबाळ अवस्थेत जमिनीवर कोसळले. नागरिकांनी ही विदारक घटना पाहताच तातडीने नानलपेठ पोलीस ठाण्याला माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक जीवन बेनीवाल, पोलीस निरीक्षक गणेश कदम, सहायक पोलीस निरीक्षक खजे, पोलीस उपनिरीक्षक बिक्कड आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविला. अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुंजाळ यांनीही रुग्णालयात भेट देऊन माहिती घेतली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT