परभणी

परभणी : अपघातात गंभीर जखमी झालेले नरवाडी येथील भगवान वाघमारे यांचे निधन

अविनाश सुतार

सोनपेठ: पुढारी वृत्तसेवा : परभणी रस्त्यावरील भारसवाडा उमरी पाथरी चौकात भरधाव वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झालेले सोनपेठ तालुक्यातील नरवाडी गावचे समाजसेवक भगवान वाघमारे यांचे आज (दि. १३) उपचारादरम्यान निधन झाले. तर पंचायत समितीचे माजी सभापती रामराव जोगदंड यांची प्रकृती अत्यवस्थ असल्याचे सांगितले जात आहे.

परभणी रस्त्यावरील भारसवाडा उमरी पाथरी चौकात गुरुवारी (दि. ११) वाघमारे यांच्या दुचाकीला भरधाव वाहनाने जोराची धडक दिली होती. या भीषण अपघातात भगवान वाघमारे आणि रामराव जोगदंड गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर परभणी येथे अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. दरम्यान, आज पहाटे ३ च्या सुमारास वाघमारे यांचे निधन झाले. तर जोगदंड यांची प्रकृती अत्यवस्थ आहे.

मृत भगवान वाघमारे यांच्या पश्चात आई, पत्नी व पाच मुली असा परिवार आहे. त्यांची आई पुष्पाबाई रामभाऊ वाघमारे सरपंच आहेत. वाघमारे गोरगरिब, निराधार, अपंग विधवा, परितक्त्या, भूमिहीन शेतमजूर यांच्या मदतीसाठी धावून जात होते. त्यांच्या अकाली निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT