Parbhani News : परभणी तालुक्यात २३ हजारांवर शेतकरी आयडीपासून दूर  File Photo
परभणी

Parbhani News : परभणी तालुक्यात २३ हजारांवर शेतकरी आयडीपासून दूर

पीकविमा, अनुदान, कृषी योजनांसाठी फार्मर आयडी बंधनकारक : तहसीलदार डॉ. राजापुरे

पुढारी वृत्तसेवा

Over 23,000 farmers in Parbhani taluka are away from ID

परभणी, पुढारी वृत्तसेवा :

तालुक्यातील अजनूही २३ हजार २३४ शेतकऱ्यांची फार्मर आयडीची नोंदणी प्रलंबित आहे. शेतकऱ्यांना विविध कृषी योजनांचा लाभ प्रभावी मिळवून देण्यासाठी 'अॅग्रिस्टॅक' योजना राबविण्यात येत आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी फार्मर आयडी तयार करून घेण्याचे आवाहन तहसीलदार डॉ. संदीप राजापुरे यांनी केले आहे.

विविध कृषिविषयक योजनेंतर्गत शेतकरी व त्यांच्या शेतजमिनींची माहिती एकत्र करून 'फार्मर आयडी' (शेतकरी ओळख क्रमांक) देण्यात येत आहे. यासंदर्भात तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी फार्मर आयडी तयार करून घ्यावेत. १५ एप्रिलपासून 'फार्मर आयडी' आवश्यक केलेला आहे, हा क्रमांक शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभघेण्याासाठी अनिवार्य असल्याचे सांगितले.

परभणी तालुक्यात एकूण ७० हजार ६९० खातेदारांपैकी फक्त ४७ हजार ४५६ शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण झाली. उर्वरित २३ हजार २३४ शेतकऱ्यांची नोंदणी अद्याप प्रलंबित आहे. यामुळे उर्वरित शेतकऱ्यांनी तत्काळ नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून फार्मर आयडी मिळवावा, असे आवाहन तहसीलदार डॉ. राजापुरे यांनी केले.

फार्मर आयडी तयार केल्यामुळे पीएम किसान योजनेचा लाभ सुलभ होतो. शेतकरी कर्ज वितरणात सुलभता, पीकविमा योजनेचा लाभ मिळतो. पीक हमीभाव खरेदीसाठी मदत होते. किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत कर्ज सुलभतेने मिळते. महाडीबीटी अंतर्गत कृषी योजनांचा लाभमिळतो, नैसर्गिक आपत्तीत पीक नुकसानीचे अनुदान मिळते. राज्य व केंद्र शासनाच्या सर्व कृषी योजनांसाठी सदरील आयडी हा आवश्यक असल्याचे कळविण्यात आले आहे.

आयडीच्या नोंदणीसाठी आवश्यक केंद्रे

शेतकऱ्यांना फार्मर आयडी काढून घेण्यासाठी केंद्रे निश्चित करण्यात आलेली आहेत. यातूनच ग्रामपंचायत स्तरा वरील सीएससी सेंटर, आपले सरकार सेवा केंद्र, सेतू कार्यालय येथे शेतकरी ओळखपत्राची नोंदणी करता येते. शेतकरी ओळखपत्राच्या नोंदणीसाठी शेतकऱ्याचे आधारकार्ड आणि ७/१२ उतारा ही कागदपत्रे आवश्यक आहेत. आपला 'फार्मर आयडी' तयार न केल्यास नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचे अनुदान, पीकविमा योजनेचा लाभ व इतर कृषी सवलती मिळणार नाहीत. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी नोंदणी तत्काळ करून घ्यावी, असे आवाहन तहसीलदार डॉ. संदीप राजापुरे यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT