परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला राष्ट्रीय पुरस्कार File Photo
परभणी

परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला राष्ट्रीय पुरस्कार

नाबार्ड स्थापना दिनी जागतिक स्तरावर ठसा; बेस्ट डीसीसीबी ओव्हरऑल परफॉर्मन्सने सन्मान

पुढारी वृत्तसेवा

National Award to Parbhani District Central Cooperative Bank

परभणी, पुढारी वृत्तसेवा: परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सहकार क्षेत्रात आपली कार्यक्षम आणि पारदर्शक कामगिरी सिध्द करताना बेस्ट डीसीसीबी ओव्हरऑल परफॉर्मन्स हा राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेचा पुरस्कार पटकावला. नाबार्डच्या ४४ व्या स्थापना दिनानिमित्त आणि आंतरराष्ट्रीय सहकारी वर्षाच्या पार्श्वभूमीवर पुणे येथे पार पडलेल्या भव्य समारंभात हा पुरस्कार बँकेला प्रदान करण्यात आला.

पुरस्काराचे वितरण केंद्रीय र्थराज्यमंत्री मुरलीधरराव मोहोळ यांच्या हस्ते झाले. जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्यंकटेश कुरुंदकर व मंगेश फुलारी यांनी हा पुरस्कार सन्मानपूर्वक स्विकारला.

या सोहळ्यासाठी राज्याचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, नाबार्डचे मुख्य कार्यकारी संचालक गोवर्धन रावत, सहकार आयुक्त दीपक तावरे, अतिरिक्त सहकार आयुक्त व निबंधक वाडेकर, मुख्य व्यवस्थापक रश्मी दरड, राजेश सुरवसे, नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी सुनील नवसारे, एनडीडीबीचे अध्यक्ष डॉ. व्ही. श्रीधर, एनएएफएससीओबीचे अध्यक्ष के. रवींद्रराव, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक आस्कर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दिघे आदी उपस्थित होते. परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ग्रामीण अर्थव्यवस्थेला सक्षम करणारी धोरणे राबविली. शेतकरी, लघु उद्योजक, महिला बचतगट, स्वयंसेवी संस्थांच्या आर्थिक गरजांची जाण ठेवत बँकेने ग्राहकाभिमुख सेवा, आर्थिक शिस्त, सुसंगत लेखापध्दती, पारदर्शक व सुशासित व्यवस्थापन या तत्त्वांवर भर दिला आहे.

या पुरस्काराने परभणी जिल्ह्याचा सहकार क्षेत्रातील लौकिक उंचावला, बँकेचे अध्यक्ष माजी आ. सुरेश वरपुडकर, उपाध्यक्ष राजेश पाटील गोरेगावकर, तसेच संचालक मंडळाचे प्रभावी नेतृत्व, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रामाणिक प्रयत्न, जिल्ह्यातील हितचिंतक व सभासदांचे सहकार्य या सर्वांचे हे फलित आहे, असे गौरवोदगार बँकेच्या वतीने काढण्यात आले.

हा पुरस्कार म्हणजे केवळ परभणी बँकेचा नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या सहकारी क्षेत्राच्या प्रगतीचा प्रातिनिधिक नमुना आहे. परभणी जिल्हा बँकेने आज एक आदर्श निर्माण केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT