Nanded News : विद्यार्थ्यांमध्ये वाहतुकीविषयी जागृती file photo
परभणी

Nanded News : विद्यार्थ्यांमध्ये वाहतुकीविषयी जागृती

जिल्हा अपघातमुक्त करण्याचे पोलिसांचे अभियान

पुढारी वृत्तसेवा

Nanded News: Awareness about traffic among students

नांदेड, पुढारी वृत्तसेवा : विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियमांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि रस्ते अपघात रोखण्यासाठी नांदेड जिल्हा पोलिसांच्या वतीने विशेष जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. पोलिस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान जिल्हाभर राबवले जात आहे.

शहर वाहतूक शाखेचे प्रभारी पोलिस निरीक्षक मारोती मुंडे, पोलिस कर्मचारी आणि तेलंगणा येथील स्वयंसेवक शौर्य यांच्या सहकार्याने शहरातील विविध शाळा, महाविद्यालये व कोचिंग क्लासेसमध्ये प्रत्यक्ष भेटी देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. पीपीटी, माहितीपूर्ण व्हिडिओ आणि संवादात्मक पद्धतीने अपघातांची कारणे व उपाययोजना यावर प्रकाश टाकला जात आहे.

आजचे विद्यार्थी हे उद्याचे जबाबदार नागरिक असल्याने त्यांच्यात बालवयापासूनच वाहतूक शिस्तीचे संस्कार रुजवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. त्यांच्या विद्यार्थ्यांसोबतच कुटुंबीयांनीही नियमांचे पालन करावे, असे आवाहन वाहतूक शाखेकडून करण्यात आले.

वाहतूक शिस्त केवळ कायद्याचे पालन नसून प्रत्येकाच्या सुरक्षेशी जोडलेली सामाजिक जबाबदारी आहे. पालकांनी व नागरिकांनी स्वयंप्रेरणेने वाहतूक नियमांचे पालन करून 'अपघातमुक्त नांदेड' घडवण्यासाठी योगदान द्यावे.
- डॉ. नीलाभ रोहन, पोलिस अधीक्षक, नांदेड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT