पिंगळी येथे दारु पिण्यास नकार दिल्याने तरुणाचा खून करण्यात आला.  Pudhari Photo
परभणी

पिंगळी येथे दारु पिण्यास नकार दिल्याने तरुणाचा खून

पुढारी वृत्तसेवा

ताडकळस, पुढारी वृत्तसेवा : तू परभणीला चल, आपण दारु पिऊन मजा करु, असे म्हणून जबरदस्ती केली. त्यास नकार दिल्याने मानेवर, हातावर, पायावर, पाठीवर काठीने जबर मारहाण करून तरुणाचा खून केला. ही धक्कादायक घटना आज (दि.१३) सकाळी १० च्या सुमारास पिंगळी (ता. परभणी) येथे घडली. याप्रकरणी ताडकळस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

शेख गौस शेख मेहबूब (वय ३०, रा. पिंगळी, ता. परभणी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर शेख समीर शेख नसीर (वय २५), शेख नसीर शेख मुसा (वय ४५, दोघे रा. पिंगळी, ता. परभणी, जि. परभणी) अशी संशयित आरोपींची नावे आहेत.

पुढील तपास ताडकळस पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक गजानन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवकात नागरगोजे, काठेवाडे करीत आहेत. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी चंद्रशेन देशमुख यांनी भेट दिली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT