MLA Dr. Rahul Patil : बोगस डॉक्टरांवर कारवाई करा  file photo
परभणी

MLA Dr. Rahul Patil : बोगस डॉक्टरांवर कारवाई करा

परभणीसह मराठवाड्यात कार्यरत असलेल्या बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी परभणीचे आ.डॉ. राहुल पाटील यांनी विधानसभेत केली.

पुढारी वृत्तसेवा

MLA Dr. Rahul Patil: Take action against bogus doctors

परभणी, पुढारी वृत्तसेवा : परभणीसह मराठवाड्यात कार्यरत असलेल्या बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी परभणीचे आ.डॉ. राहुल पाटील यांनी विधानसभेत केली. यावर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

परभणीसह मराठवाड्यामध्ये बोगस डॉक्टरांची संख्या वाढली आहे, यामुळे रुग्णांवर चुकीच्या पद्धतीने उपचार होत असल्याचा मुद्दा परभणीचे आ.डॉ. पाटील यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी उपस्थित केला. आ.डॉ. पाटील म्हणाले, मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात बोगस डॉक्टरांची संख्या वाढली आहे.

विशेषतः बंगाली डॉक्टर मराठवाड्यात आले आहेत. त्यांना कुठलीही पदवी नाही तरी देखील ते सरासपणे ग्रामीण भागात वैद्यकीय व्यवसाय करत आहेत. आणि रुग्णांच्या जीविताशी खेळत आहेत. यामुळे या डॉक्टरांवर कारवाई करावी अशी मागणी आ. पाटील यांनी केली. पुढे ते म्हणाले बोगस डॉक्टरंवर कारवाई करण्यासाठी जिल्हास्तरीय समिती आहेत परंतु त्या समितीचे अध्यक्ष असलेले जिल्हाधिकारी कुठल्याही प्रकारची तपासणी अथवा बोगस डॉक्टरांवर कारवाई करत नसल्याचा आरोप यावेळी आ. पाटील यांनी केला.

या समितीमध्ये लोकप्रतिनिधींचा समावेश करावा, त्यामुळे अशा सर्व बोगस डॉक्टरांची तपासणी करून त्यांचा वैद्यकीय परवाना पहावा आणि त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी आ. पाटील यांनी शासनाकडे केली असता त्याला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी उत्तर दिले.

ते म्हणाले बोगस डॉक्टरांच्या संदर्भात तपासणीसाठी असलेल्या समित्यांमध्ये लोकप्रतिनिधींचा सहभाग करण्यात येईल नव्याने समित्यांची नियुक्ती करू तसेच नव्या किंवा कोड प्रणालीतून बोगस डॉक्टर कळतील असे हसन मुश्रीफ म्हणाले. तसेच नागरिकांनी बोगस डॉक्टरांच्या तक्रारी कराव्यात असे आवाहन त्यांनी केले आ. डॉ. पाटील यांच्या या प्रश्नामुळे बोगस डॉक्टरांचा प्रश्न ऐरणीवर आला असून सरकार निश्चितच याकडे लक्ष देऊन बोगस डॉक्टरांना आळा घालील अशी आशा निर्माण झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT