गंगाखेडमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार file photo
परभणी

परभणी : गंगाखेडमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार

करण शिंदे

गंगाखेड शहरातमध्ये ग्रामीण भागातून खासगी शिकवणीसाठी आलेल्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. यावेळी तिला चॉकलेटचे अमिष दाखवून लॉजवर घेऊन शुक्रवारी (दि.30) अत्याचार केला. या प्रकरणातील तरुणाविरुद्ध गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने आरोपीस शनिवार (दि.३) सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

ग्रामीण भागातून शहरात खासगी शिकवणीसाठी आलेल्या एका अल्पवयीन मुलीवर शनिवारी (दि.३०) दुपारी आरोपी श्याम लेवडे याने मोबाईलवर फोन करून तू मला आवडतेस माझ्यासोबत बोलत जा असे म्हणून फिर्यादीची जवळीक साधली. तिला बसस्थानकासमोरील आनंद लॉजमध्ये नेऊन तिला चॉकलेट खायला देत तिच्यावर इच्छेविरुद्ध अत्याचार केले. याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून गंगाखेड पोलीस ठाण्यात आरोपी श्याम लेवडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उपविभागीय पोलीस अधिकारी शाम टिपरसे, पोलीस निरीक्षक दीपककुमार वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सिंगनवाड यांनी गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि लोणीकर हे करीत आहेत. आरोपीस पोलिसांनी शनिवारी गंगाखेड येथील न्यायालयासमोर हजर केले असता त्यास ३ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सोनावण्यात आली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT