Meghna Bordikar : दुष्काळप्रश्नी लोकप्रतिनीधिनीं एकत्र येण्याची गरज  File Photo
परभणी

Meghna Bordikar : दुष्काळप्रश्नी लोकप्रतिनिधींनी एकत्र येण्याची गरज

जवळपास दिड महिन्यापासून पाऊस गायब ज झाला असून खरीपांची पिके जळून खाक झाली आहेत.

पुढारी वृत्तसेवा

Meghna Bordikar : The need for people's representatives to come together on the issue of drought

परभणी : सुभाष कच्छवे जवळपास दिड महिन्यापासून पाऊस गायब झाला असून खरीपांची पिके जळून खाक झाली आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी झाली असून एरवी सोयीचे राजकारण करत एकत्र येणाऱ्या लोकप्रति-नीधींनी दुष्काळाच्या प्रश्नावर एकत्र येत जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्यास प्रशासन व शासनास भाग पाडावे, असा सूर नागरिकांमधून निघत आहे.

एकेकाळी ज्वारीचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व काळीशार सुपीक जमीन असलेल्या परभणी जिल्ह्यात आज शेतशिवारात मरणासन्न व सुतकी वातावरण निर्माण झाले असून डोळ्यादेखत जळणारी पिके पाहून बळीराजाही अस्वस्थ झाला आहे. ज्या श्रावणामध्ये पिकांनी ऐटीत डोलायला पाहिजे, त्याच श्रावणात पिके चक्क करपून गेली असून शेतकऱ्यांची स्वप्नही करपल्यागत झाली आहेत.

बळीराजा संकटात असताना लोकप्रतिनिधींनी एकत्र येत बळीराजाचा आवाज विधानसभेत बुलंद करण्याची गरज निर्माण झाली आहे. मागील दिड महिन्यापासून पावसाने उघडीप दिल्यामुळे खरीपातील कापूस, तूर, मूग, उडीद, केळी, हळद या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पाथरी विधानसभा मतदार संघाचे आ. राजेश विटेकर यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेवून मराठवाड्यात अत्यल्प व खंडीत पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना पिकविमा व मराठवाड-यासाठी विशेष पॅकेज देण्याची मागणी केली मतदार संघाचे आ. डॉ. राहुल पाटील यांनीही जिल्ह-अधिकारी यांना निवेदन देत पिकविम्याचा लाभदेण्याची मागणी केली आहे.

जिंतूरचे माजी आ. भांबळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत जिंतूर-सेलू तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. जिल्ह्यातील चारपैकी तीन आमदार हे महायुतीमधील आहेत. खा. संजय जाधव व विधान परिषदेचे आ. सईद खान हे देखील महायु-तीमध्येच आहेत. जिल्ह्याला मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या रुपाने स्थानिक पालकमंत्री लाभला आहे. पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्याकडे एक संवेदनशील नेतृत्व म्हणून पाहिल्या जाते. जिल्हयातील दुष्काळी परिस्थितीविषयीही मेघना बोर्डीकरांना माहिती आहे. आज शेतकरी हतबल झाला असताना, त्याला खऱ्या अर्थाने मदतीची गरज आहे.

जे-जे लोकप्रतिनिधी दुष्काळी प्रश्नावर आज-तागायत बोलले नाहीत, त्यांनी दुष्काळाचे भयान वास्तव समजून घेवून दुष्काळावर विधानसभेत बोलण्याची गरज निर्माण झाली आहे. जिल्हयातील लोकप्रतिनिधी बऱ्या-चवेळेला राजकीय मतभेद विसरून एकत्र आल्याचे जिल्ह्याने या पूर्वी अनेकदा पाहिले आहे.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावरही त्यांनी असेच एकत्र येण्याची गरज निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडण-वीसांच्या निकटवर्तीय असलेल्या पालकमंत्री तथा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करून दुष्काळी सवलतीची अंमलबजावणी करण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. भले त्या सत्तेत असल्यातरी पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर घेतलेला पुढाकार शेतकऱ्यांना दिलासा देणारा ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT