पूर्णा, पुढारी वृत्तसेवा: बिहार येथील महाबोधी महाविहार अखिल भारतीय भिक्खू संघाच्या ताब्यात द्यावे, या मागणीसाठी पूर्णा शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आजपासून (दि. ७) वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महास्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. (Parbhani News)
यावेळी वंचितचे युवक जिल्हाध्यक्ष तुषार गायकवाड, संदीप सावळे, सुनील मगरे, राजू नारायणकर, सिताराम रेणगडे, सुनील गवळी, अजय काळे, राधिका गोधणे, मिलिंद सोनकांबळे, शाहीर प्रकाश जोंधळे, नितीन बोधक, शबीर पठाण, शेख तौफिक यासह सर्व आंबेडकरवादी, संविधानवादी, समतावादी कार्यकर्त्यांनी स्वाक्षऱ्या केल्या.
दरम्यान, बिहार राज्यातील बुध्दगया येथील महाबोधी महाविहार हे तेथील शासनाच्या ताब्यात असून त्या ठिकाणी भिख्खू संघास व भगवान गौतम बुध्दांचे आनुयायांना हिन वागणूक दिली जाते. अनेक दिवसांपासून सदर महाबोधी महाविहार अखिल भारतीय भिक्खू संघाच्या ताब्यात देण्याच्या मागणीसाठी मोठे आंदोलन चालू असूनही ते मुक्त केले जात नाही. त्यामुळे सरकार विरूद्ध भगवान गौतम बुद्ध यांच्या अनुयायातून असंतोष खदखदत आहे.