Manwat Pathri Highway Bike Tipper Collision Pudhari
परभणी

Manwat Accident | मानवत-पाथरी महामार्गावर उभ्या टिप्परला दुचाकीची धडक; तीन युवक जखमी

रिफ्लेक्टर किंवा इशारा दर्शवणारा इंडिकेटर नसल्याने अपघात

पुढारी वृत्तसेवा

Manwat Pathri Highway Bike Tipper Collision

मानवत : मानवत-पाथरी राष्ट्रीय महामार्गावर उभ्या असलेल्या टिप्परला दुचाकी धडकून झालेल्या अपघातात तीन युवक जखमी झाल्याची घटना गुरुवारी (ता. १२) रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास तहसील कार्यालयाजवळ घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या टिप्परला कोणताही रिफ्लेक्टर किंवा इशारा दर्शवणारा इंडिकेटर नसल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. एमएच २४ एयू ७५६१ क्रमांकाचा टिप्पर बिघाड झाल्यामुळे रस्त्यालगत उभा करण्यात आला होता.

प्रथमेश ज्ञानेश्वर केदारे, आकाश शिवाजीराव वांगीकर आणि पृथ्वीराज विश्वनाथ गायकवाड (सर्व रा. पाथरी) हे तिघे एमएच २२ बीजी १७१४ क्रमांकाच्या दुचाकीवरून मानवत येथील कॉलेज मैदानावर खेळून पाथरीकडे जात होते. अंधारामुळे रस्त्यावर उभा असलेला टिप्पर न दिसल्याने त्यांची दुचाकी थेट टिप्परच्या मागील बाजूस जाऊन धडकली.

या अपघातात तिन्ही युवक जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत करून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. त्यापैकी प्रथमेश केदारे आणि पृथ्वीराज गायकवाड यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी परभणी येथे हलविण्यात आले आहे.

या घटनेची नोंद मानवत पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत झालेली नव्हती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT