जिंतूर : तालुक्यात शनिवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस झाला. यात तालुक्यातील पिंपरी रोहिला येथील एका 19 वर्षीय युवकाचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला.
पिंपरी रोहिला शिवारातील शेतात भरत गंगाधरराव पिसाळ हा काम करत असताना त्याच्या अंगावर वीज पडली. उपचारासाठी त्यास बोरी रुग्णालयात दाखल केले असताना डॉक्टरांनी पिसाळ यास मृत घोषित केले. त्याच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या पश्च्यात आई-वडील असा परिवार आहे.