lemon Limbu Representative image Pudhari
परभणी

lemon price: उन्हाळ्याची तीव्रता वाढताच लिंबू महागले, १८० रुपये किलोचा भाव

उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असताना बाजारात लिंबाच्या दरांनी चांगलीच उसळी घेतली.

पुढारी वृत्तसेवा

Lemons have become expensive, fetching a price of ₹180 per kilogram.

परभणी, पुढारी वृत्तसेवा

उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असताना बाजारात लिंबाच्या दरांनी चांगलीच उसळी घेतली. सध्या लिंबू १७० ते १८० रुपये प्रति किलोने विक्री होत असून, काही दिवसांपूर्वी ५ रुपयांत ५ ते ६ लिंबे मिळणारे ते आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले.

गेल्या १५ दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत असल्याने नागरिकांचा ओढा थंड पेयांकडे वाढला. विशेषतः लिंबू सरबत, ऊसाचा रस (रसवंती) आदी पेयांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली. शरीराला थंडावा देणारे व ऊर्जा टिकवून ठेवणारे पेय म्हणून लिंबू सरबताला विशेष पसंती मिळत आहे.

परिणामी बाजारात लिंबाची मागणी झपाट्याने वाढली आहे. मात्र दुसरीकडे लिंबाची आवक कमी असल्यामुळे दरवाढ झाली. व्यापाऱ्यांच्या मते, उत्पादनात घट आणि वाहतूक खर्चात वाढ याचाही परिणाम किमतीवर झाला आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात लिंबाचे दर गगनाला भिडले.

दरवाढीचा थेट फटका सर्वसामान्यांना बसत असून त्यांच्या दैनंदिन जेवणातील लिंबू आता दुर्मिळ झाले आहे. हॉटेल्स व रसवंतीगृहांतही लिंबाची मागणी मोठ्या प्रमाणात असल्याने दर स्थिर होण्याची शक्यता कमी असल्याचे व्यापारी सांगतात. लिंबू हे नगदी पीक असले तरी त्याची काढणी काटेरी झाडांमुळे कष्टप्रद असल्याचे शेतकरी सांगतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT