परभणी, पुढारी वृत्तसेवा : शहरातील प्रतिष्ठीत व्यापारी, सामाजिक क्षेत्रातील नागरिक, विविध पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी परभणी विधानसभेचे आ.डॉ. राहूल पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला.
आ. राहुल पाटील यांच्या मागील १० वर्षातील विकासात्मक कामांसह, सर्वांना सोबत घेत शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी केलेले प्रयत्न आणि कार्यशैलीमुळे त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रमुख मान्यवरांनी शनिवारी हा पक्षप्रवेश केला. आ.डॉ. पाटील यांच्या संपर्क कार्यालयात शनिवारी हा प्रवेश सोहळा पार पडला. या प्रवेशामध्ये भाजपाच्या महिला आघाडी माजी जिल्हाध्यक्षा सुप्रिया कुलकर्णी, शहरातील सामाजिक कार्यकर्ते तथा प्रतिष्ठीत व्यापारी विकी उर्फ संतोष नारवानी, प्रतिष्ठीत व्यापारी कपिल कोठारी, जितेंद्र खैराजान, शिंदे सेनेचे ज्येष्ठ शिवसैनिक मोहन टाक, अँड. प्रिती घुले यांनी यावेळी प्रवेश केला.
संत कंवरराम सेवा मंडळ अंतर्गत डॉ. रमेश आहुजा, दिलीप माटरा, राजेश खैराजानी यांनी सुद्धा प्रवेश केला. यावेळी आ.डॉ. राहुल पाटील यांनी सर्वांचे स्वागत केले. या प्रवेशप्रसंगी सहसंपर्कप्रमुख डॉ. विवेक नावंदर, संजय गाडगे, अंबिका डहाळे, अनिल डहाळे, अरविंद देशमुख, ज्ञानेश्वर पवार, विशू डहाळे, बाळराजे तळेकर, दिलीप माटरा, राजू खैराजानी यांची उपस्थिती होती. शिवाय कैलास पतंगे यांची युवासेना प्रभाग प्रमुखपदी तर शंतनू देशमुख यांची प्रभाग १५ प्रमुखपदी नियुक्ती केली. विष्णू कदम यांनीही प्रवेश केला.
सर्वसामान्ऱ्यांमध्ये पक्षाचे काम रुजलेले आहे. मागील १० वर्षात आ. डॉ. राहुल पाटील यांनी सर्वसामान्य नागरिकांची आरोग्य, शिक्षण, उद्योग, स्वयंरोजगार आणि विविध क्षेत्रात केलेल्या विकासात्मक कामासह दूरदृष्टीमुळे त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रमुखांनी प्रवेश केल्याचे नमूद केले. आगामी काळातही अशा अनेक प्रमुख मान्यवरांचे पक्षांमध्ये प्रवेश होणार असल्याचे यावेळी स्पष्ट केले.