Ladki Bhahin scheme will be closed: Atul Londhe
परभणी, पुढारी वृत्तसेवा आज घडीला लाडक्या बहिणींच्या संख्येला कात्री लावून त्यांना अपात्र ठरविण्यात येत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतर लाडकी बहीण योजना बंद करण्यात येईल असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी शहरातील सावली विश्रामगृहावर आयोजीत पत्रकार परिषदेत केला.
यावेळी माजी खा. अॅड. तुकाराम रेंगे पाटील, माजी आ. सुरेश देशमुख, काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबीरे, नदीम इनामदार, भगवान वाघमारे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमोल जाधव, रवी सोनकांबळे, प्रा. रामभाऊ घाटगे, माजी जिल्हाध्यक्ष बालकिशन चांडक, राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब देशमुख, रवीराज देशमुख, नागसेन भेरजे यांची उपस्थिती होती. या प्रसंगी पुढे बोलताना अतुल लोंढे म्हणाले की, तपास यंत्रणांचा गैरवापर करून सत्त राधाऱ्यांनी उच्छाद मांडला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत काँग्रेसचा एकहाती झेंडा फडकणार असल्याचे सांगत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. कार्यकर्ते, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या संदभनि जोरदार कामाला लागल्याचेही त्यांनी सांगीतले. जिल्हाध्यक्ष पदासाठी अनेकजण इच्छुक असून पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेइल तो आम्हाला मान्य असल्याचे सर्व इच्छुकांनी सांगितल्याचे लोंढे म्हणाले. जिल्हाध्यक्ष निवडी संदर्भात आपला अहवाल प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे सादर केल्यानंतर प्रदेशाध्यक्ष निर्णय घेतील असे लोंढे म्हणाले. राज्यातील व केंद्रातील सत्त-नेतेारुढ सरकार हे शेतकरी विरोधी व युवक विर- ोधी असल्याचे त्यांनी सांगीतले.
शक्तिपीठ महामार्ग हा अदानीचे खिसे भरण्यासाठी केल्या जात असून शक्तिपीठाच्या माध्यमातून तुम्हाला कोणाला शक्ती द्यायची आहे, असा सवाल ही लोंढे यांनी उपस्थित केला.
शाब्बासकीचा हात कोणाच्या पाठीवर पडणार
माजी राज्यमंत्री सुरेश वरपुडकरांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदासाठी अनेकजण इच्छुक आहेत. बाळासाहेब देशमुख, बाळासाहेब रेंगे, रवीराज देशमुख, सिद्धार्थ हत्तीअंबीरे यांच्या नावाची जिल्हाध्यक्ष पदासाठी चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष माजी आ. बाबाजानी दुर्राणी यांच्याही काँग्रेस प्रवेशाची चर्चा होत असुन बाबाजानी दुर्राणी यांना पक्षात प्रवेश देवुन त्यांच्याकडे जिल्हाध्यक्ष पदाची धुरा सोपवल्या जावु शकते असा ही सुर निघत आहे. एकंदरीत काँग्रेसचा शाब्बासकीचा हात कोणाच्या पाठीवर पडणार या विषयी उत्सुकता आहे. परभणी जिल्हाध्यक्ष निवडी बाबत प्रदेशाध्यक्ष सपकाळ काही दिवसात निर्णय घेतील असे संकेत मिळत आहेत.