Massive fire : परभणीतील सोनपेठमध्ये कांबळे कुटुंबाचा संसार आगीत खाक file photo
परभणी

Massive fire : परभणीतील सोनपेठमध्ये कांबळे कुटुंबाचा संसार आगीत खाक

शॉर्टसर्किटने आग; गॅस टाकीचा स्फोट; तरुणांच्या धाडसामुळे टळला अनर्थ

पुढारी वृत्तसेवा

Kamble family's home destroyed in fire in Sonpeth, Parbhani

सोनपेठ, पुढारी वृत्तसेवा : परभणी जिल्ह्यातील सोनपेठ शहरात दहिखेड परिसरातील गौतम बाबासाहेब कांबळे यांच्या घराला शनिवारी (दि. १५) दुपारी १२ वाजेच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली. या आगीत घरातील संपूर्ण संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. यात एका गॅस टाकीचा स्फोट झाला, तर दुसरी टाकी फुगल्याने मोठा थरार उडाला. स्वातंत्र्यदिनी घडलेल्या या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.

आगीने रौद्ररूप धारण केल्यानंतर गॅस शेगडीच्या पाईपने पेट घेतला आणि एका टाकीचा भीषण स्फोट झाला. यानंतर स्थानिक ४० ते ५० तरुणांनी तसेच अग्निशमन कर्मचाऱ्यांनी धाव घेत आग विझविण्यास सुरुवात केली.

त्यांच्या प्रयत्नांमुळे आग आटोक्यात आली. यादरम्यान पाहणी करताना घरातील दुसरी गॅस टाकी प्रचंड उष्णतेमुळे फुगल्याचे निदर्शनास आले. ती कोणत्याही क्षणी फुटण्याची शक्यता असल्याने पुन्हा घबराट पसरली. मात्र, स्थानिक तरुण आशिष मुंढे तसेच गॅस एजन्सीचे कर्मचारी नारायण मिसाळ यांनी जीव धोक्यात घालून ती टाकी सुरक्षितपणे बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला.

दोन महिन्यांपूर्वीच गमावला होता मुलगा

दोन महिन्यांपूर्वीच कांबळे कुटुंबातील मुलाचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला होता. या धक्क्यातून सावरत असतानाच घराला आग लागल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नगराध्यक्ष परमेश्वर कदम यांनी हतबल कुटुंबाला तातडीची मदत दिली असून, शासनानेही या कुटुंबाला जास्तीत जास्त आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT