Accident News Pudhari
परभणी

Parbhani News : भीषण कार-दुचाकीचा अपघात; दोघांचा मृत्यू

भोगाव-मानधनी परिसरातील घटना; पाच गंभीर

पुढारी वृत्तसेवा

Horrific Car-Two-Wheeler Accident; Two Dead

परभणी, पुढारी वृत्तसेवा जिंतूर औंढा नागनाथ मार्गावरील भोगाव मानधनी दरम्यान रविवारी (दि.५) दुपारी कार आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला असून कारमधील पाच जण गंभीर जखमी झाले. जखमींवर परभणी जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मयूर शहाणे (३०) व रितेश टाक (४०, दोघे रा. वसमत) असे अपघातातील मृतांची नावे आहेत.

प्राप्त माहितीनुसार, वसमत येथील मयूर शहाणे (३०) व रितेश टाक (४०) हे दुचाकीवरून जिंतूरकडे येत होते. त्याच वेळी संभाजीनगर येथून जिंतूर-औंढा नागनाथकडे जाणारी कार भोगाव-मानधनी परिसरात आली असता दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली.

धडक इतकी भीषण होती की दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते नागेश आकात व चालक विजय राठोड यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. त्याचवेळी १०८ रुग्णवाहिका चालक महेश कांगणे व डॉ. कृष्णा घुगे हे अन्य कामासाठी जात असताना त्यांनीही अपघातग्रस्तांना मदत केली.

जखमींना तातडीने जिंतूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहिनी श्रृंगारे व त्यांच्या पथकाने जखमींवर प्राथमिक उपचार केले. मात्र उपचारादरम्यान मयूर शहाणे यांना मृत घोषित करण्यात आले. तर गंभीर जखमी रितेश टाक यांना पुढील उपचारासाठी परभणी येथे हलवण्यात आले असता त्यांचाही मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.

या अपघातात कारमधील तबसुम चाँद पाशा शेख (३०), मुनीरावी शेख खलील (६०), शेख माजीद कादर (५०), शेख सलमान माजीद व शेख शाहीदा माजीद (४०, सर्व रा. छ. संभाजीनगर) हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर परभणी जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळी सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय जाधव, परभणी गोपनीय शाखेचे हवालदार जिया खान पठाण, महामार्ग पोलिस जमादार नेतम, पोलिस कर्मचारी नरवाडे, केदारी यांनी मदतकार्य करत वाहतूक सुरळीत केली. या प्रकरणी उशिरापर्यंत अपघाताची नोंद पोलिस ठाण्यात झालेली नव्हती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT