गंगाखेडमध्ये सर्वाधिक ४ लाख १९ हजार ९४५ तर सर्वात कमी परभणी मतदारसंघात ३ लाख ५८ हजार ३३४ मतदारांचा समावेश आहे. File Photo
परभणी

गंगाखेडमध्ये सर्वाधिक तर परभणीत सर्वात कमी मतदार

पुढारी वृत्तसेवा

परभणी : जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघासाठी यावेळी १५ लाख ४४ हजार ४५१ मतदार असून यात गंगाखेडमध्ये सर्वाधिक ४ लाख १९ हजार ९४५ तर सर्वात कमी परभणी मतदारसंघात ३ लाख ५८ हजार ३३४ मतदारांचा समावेश आहे. त्या खालोखाल पाचरीत ३ लाख ९० हजार ६९५ तर जिंतूरात ३ लाख ८५ हजार ४७७ मतदार आहेत. या चारही मतदारसंघात शहरी व ग्रामीण एकूण १ हजार ६२३ मतदान केंद्रे आहेत. यात ६ संवेदनशील मतदान केंद्रांचा समावेश आहे.

जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे अप्पर जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे, उपजिल्हाधिकारी जनार्धन विधाते यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत विधानसभा निवडणूकी संदर्भातील तयारी व मतदारांची संख्या, केंद्रे, लागणारे मनुष्यबळ व यंत्रणा याबाबतची सविस्तर माहिती दिली. जिंतूर मतदारसंघात १ लाख ९८ हजार ९३२ पुरूष तर १ लाख ८६ हजार ४४० स्त्री मतदार आहेत. परभणीत १ लाख ७७ हजार ७८९ पुरूष तर १ लाख ७० हजार ३७२ स्त्री मतदारांचा समावेश आहे. गंगाखेडमध्ये २ लाख १७ हजार १६९ पुरूष तर २ लाख १ हजार ९९७ स्त्री मतदारांचा समावेश आहे.

पाथरीत २ लाख १ हजार ८८४ पुरूष तर १ लाख ८८ हजार ७२१ स्त्री मतदार आहेत. एकूण पुरूष मतदारांची संख्या ७ लाख ९५ हजार ७१४ इतकी आहे. तर स्त्री मतदारांची संख्या ७लाख ४७ हजार ५३० आहे. चारही मतदारसंघात तृतीयपंथी मतदारांची संख्या २९ आहे. तर सैन्यदलातील मतदारांची संख्या १ हजार १७८ इतकी असून यात गंगाखेडमध्ये सर्वाधिक ७७४ मतदार सैन्य दलातील आहेत. दिव्यांग मतदारांची चार मतदारसंघात एकूण ७ हजार ८११ इतकी संख्या आहे. तर ८५ वर्ष वयावरील मतदारांची संख्या २४ हजार ३४३ इतकी आहे. १८ ते १९ या वयोगटातील नव मतदारांची संख्या ३७ हजार ११८ इतकी आहे. चारही मतदारसंघात स्त्री-पुरूष लिंग गुणोत्तराचे प्रमाण दर हजारी ९३७ इतके आहे.

१२ हजारांवर मनुष्यबळाची उपलब्धता

विधानसभा निवडणूकीसाठी प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या असून जिल्ह्यात १७१ क्षेत्रिय अधिकारी, ५५० विविध पथकातील अधिकारी व कर्मचारी आणि मतदान केंद्रांवरील १२ हजार ५६८ अधिकाऱ्यांचे मनुष्यबळ उपलब्ध करण्यात आले आहे. निवडणूक कामावरील नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी- कर्मचाऱ्यांना पोस्टल मतदानाची सुविधा राहणार आहे. प्रत्येक विधानसभानिहाय एका मतदान केंद्रावर केवळ १ महिला मतदान अधिकारी असतील. एका ठिकाणी केवळ दिव्यांग मतदान अधिकारी तर एका ठिकाणी केवळ तरूण अधिकारी हे मतदान अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत त्याचबरोबर काही मतदान केंद्रे ही आदर्श मतदान केंद्रे म्हणून तयार करण्यात येणार आहे. व ५० टक्के केंद्रांवर वेब कास्टींग सुद्धा करण्यात येणार आहे.

जिंतुरात सर्वाधिक ४३८ केंद्रे

चार विधानसभा मतदारसंघात असलेल्या १६२३ केंद्रांमध्ये जिंतूर मतदारसंघात सर्वाधिक ४३८ केंद्रे आहेत. यात शहरी ८३ तर ३५५ ग्रामीण केंद्रांचा समावेश आहे. परभणीत २४२ शहरी व ९६ ग्रामीण असे एकूण ३३८, गंगाखेडमध्ये शहरी १२६ व ग्रामीण ३०६ अशी एकूण ४३२ केंद्रे आहेत. पाथरीत शहरी ७१ तर ग्रामीण ३४४ अशी ४१५ केंद्रे आहेत. चार मतदारसंघात शहरी केंद्रांची संख्या ५२२ तर ग्रामीणची ११०१ इतकी आहेत. जिंतूर व परभणीत प्रत्येकी २ तर गंगाखेड व पाथरीत प्रत्येकी १ अशी सहा संवेदनशील केंद्रे आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT