Parbhani News | विधानसभा निवडणुकीसाठी ३३ कक्षांची स्थापना

परभणी : ३३८ केंद्रांवर जनजागृती, शुक्रवारी पथकांच्या बैठका
Parbhani News
परभणी डीपीडीसी सभागृहात अप्पर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे यांनी कर्मचाऱ्यांची बैठक घेतली.Pudhari
Published on
Updated on

परभणी - विधानसभा निवडणुकीसाठी विविध निवडणूक विषयक कामे पार पाहण्यासाठी परभणी मतदारसंघात ३३ कक्ष स्थापन करण्यात आले असून त्यानुसार अधिकारी-कर्मचाऱ्यांना कक्षनिहाय आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय निवडणुकीसाठी गठीत करण्यात आलेल्या विविध पथकांची बैठक येत्या शुक्रवारी (दि.४) सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली आहे.

प्रशासनाने विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली असून आयोगाच्या सूच नेनुसार विविध पथके व कक्षांची स्थापना केली आहे. परभणी विधानसभा मतदारसंघात या कक्षाची जबाबदारी दिलेल्या अधिकारी, कर्मचऱ्यांना आदेश देऊन त्यांची मंगळवारी जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात बैठक घेण्यात आली.

त्याचबरोबर नियुक्त कक्षातील कर्मचान्यांना बैठकांना गैरहजर राहिल्यास त्यांच्याविरुद्ध निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

प्रशासनाने या निवडणुकीसाठी खर्चावर नियंत्रण ठेवण्याबरोबरच पारदर्शक पद्धतीने कामकाज होण्यासाठी स्थिर सनियंत्रण पथक, भरारी पथक, व्हिडीओ सनिरीक्षण पथक व व्हिडीओ चित्रीकरण उपासणी पथक गठीत केले आहे. या पथकांची शुक्रवारी बैठक होणार आहे. त्याचबरोबर मतदान जनजागृतीचे कामकाज या नियुक्त पथकामार्फत तालुक्यातील ३३८ मतदान केंद्रांवर जनजागृतीचे काम केले जाणार आहे. दैनंदिन भेटी घेऊन मतदारांमध्ये ईव्हीएम व व्हीव्हीपॅटविषयी माहिती देण्याबरोबरच वोटर हेल्पलाईन अॅपबाबत मार्गदर्शन केले जात आहे

गैरहजर ३५ जणांना कारणे दाखवा नोटीस

विधानसभा निवडणूक अनुषंगाने परभणी मतदारसंघ अंतर्गत नेमलेल्या ३३ कक्षातील ५७८ अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक जिल्हा नियोजन समिती सभागृहात मंगळवारी (दि.१) अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी जनार्दन विधाते, एसडीएम दत्तू शेवाळे, मनपा अपर आयुक्त निबीनाथ दंडवते, वहसीलदार डॉ. संदीप राजपुरे, तहसीलदार सामान्य प्रशांत वाकोडकर, बीडीओ दीपा बापट, नायब तह‌सीलदार अनिकेत पालेपवाड, महसूल नायब तहसीलदार मधूकर क्षीरसागर, नायब तहसीलदार निवडणूक अनिता वडवळकर आदींच्या उपस्थितीत पार पडली, बैठकीस गैरहजर राहिलेल्या ३५ अधिकारी व कर्मचाऱ्यांना कार्यालय स्तरावरून कारणे दाखवा नोटिसा लवकरच बजावण्यात येणार आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news