बंजारा समाजासमवेत पालकमंत्री तथा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी होळीचा सण उत्साहात साजरा केला Pudhari
परभणी

Banjara Holi | बंजारा भगिनींसोबत नृत्य करत पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी साजरी केली होळी

Parbhani Holi 2026 | कुऱ्हाडी व पिंपळगाव तांड्यावर रंगोत्सव; लोकसहभागातून जपली परंपरा

पुढारी वृत्तसेवा

Meghna Sakore Bordikar Holi

जिंतूर : तालुक्यातील कुऱ्हाडी व पिंपळगाव तांडा येथे बंजारा समाजासमवेत पालकमंत्री तथा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी होळीचा सण उत्साहात साजरा केला. बंजारा भगिनींसोबत पारंपरिक वेशभूषेत रंगात न्हाऊन नृत्य करत त्यांनी रंगोत्सवात सहभाग घेतला.

होळीच्या निमित्ताने तांड्यावर पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात बंजारा समाजातील महिला-पुरुषांनी पारंपरिक गीते व नृत्य सादर केले. पालकमंत्री साकोरे-बोर्डीकर यांनीही या नृत्यात सहभाग घेत समाजाशी संवाद साधला. त्यांच्या उपस्थितीमुळे तांड्यावर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

यावेळी नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य रोहित उर्फ मुन्ना चव्हाण, विकास जाधव (अंबरवाडीकर), सरपंच संतोष राठोड, माधव राठोड, विलास चव्हाण यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालकमंत्र्यांनी नागरिकांना होळीच्या शुभेच्छा देत सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि परंपरेचे जतन करण्याचे आवाहन केले. बंजारा समाजाच्या सांस्कृतिक वारशाचे जतन करणे ही आपली सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले.

होळी या सणाच्या निमित्ताने आमच्या बंजारा बंधू-भगिनींच्या उत्साहाने मन प्रफुल्लित झाले. संस्कृती जपत, एकत्र येऊन साजरे केलेले हे रंगांचे सण कायम स्मरणात राहतील. परंपरा आणि सामाजिक एकात्मता यांचे सुंदर दर्शन येथे घडले.
- मेघना साकोरे-बोर्डीकर, पालकमंत्री तथा राज्यमंत्री, परभणी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT