Good response to doctors' strike in Parbhani
परभणी, पुढारी वृत्तसेवा : सीसीएमपी पात्रता लागत आहे असलेल्या बीएचएमएस डॉक्टरांची महाराष्ट्र मेडिकल कौन्सील मध्ये नोंदणी देण्याच्या प्रस्तावाच्या निषेधार्थ आयएमए महाराष्ट्रच्या वतीने संप पुकारण्यात आला. गुरुवारी (दि. ६) पासून अपातकालीन सेवांसह सर्व वैद्यकीय सेवा बंद ठेवण्यात आल्या.
बीएचएमएस डॉक्टरांना सीसीएमपी कोर्स पूर्ण केल्यानंतर महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये नोंदणी देण्याच्या प्रस्तावाच्या निषेधार्थ संपाचे आवाहन केले होते. या स्पष्ट केले आहे. प्रस्तावित नोंदणी आयएमए महाराष्ट्रने २४ तासांच्या संपाचे आवाहन केले होते. या आंदोलनाला एयएमए शाखेने पूर्ण पाठिंबा दर्शवित गुरुवारी (दि. ६) ऑगस्टपासून खासगी आयएमएच्या वतीने जिल्हा वैद्यकीय सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. आयए-मएच्या वतीने जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
या निवेदनावर अध्यक्ष डॉ. के. बी. चौधरी, उपाध्यक्ष डॉ. कल्याण कदम, डॉ. निलेश पवार, डॉ. नितीन कदम. डॉ. राजू सुरवसे, डॉ. एकनाथ गबाळे, डॉ. खिल्लारे, डॉ. केदार खाटिंग, डॉ. करीम, डॉ. विद्या चौधरी, डॉ. जयश्री यादव, डॉ. मंजू भालेराव, डॉ. उज्वला झांबरे, डॉ. प्रवीण संगवे, डॉ. पी.व्ही. चेवले, डॉ. आर. एम. कालानी, विजय बोंडे, डॉ. बिपीनचंद्र अवसरमल यांच्यासह जिल्ह्यातील अनेक डॉक्टरांच्या स्वाक्षऱ्या आहेत. संपामुळे वैद्यकीय सेवा ठप्प आहेत.
संप जास्त करण्यात आला आहे. शासनाकडे काळ चालला तर रुग्ण सेवेवर गंभीर परिणाम होऊ शकतो. ही बाब लक्षात घेता शासनाने तातडीने या संदर्भात तोडगा काढावा, असे डॉक्टरांनी सांगितले. गेल्या दोन वर्षापासून आमचे आंदोलन चालू आहे. शासन आमच्या मागण्यांकडे लक्ष देत नाही. शेवटचा उपाय म्हणून आम्हाला इमर्जन्सी सेवा बंद ठेवावी लागत आहे, असे डॉ. बोंडे म्हणाले.
शासनाचा बीएचएमएस झाल्यानंतर विद्यार्थ्यांना ६ ते १२ महिन्याचा ब्रीज कोर्स करुन प्रॅक्टीसलापरवानगी देण्याचे शासनाचे धोरण आहे. हा जनसामान्याच्या आरोग्याशी खेळ आहे, असे डॉ. राजु सुरवसे म्हणाले. आयएमएचे अध्यक्ष डॉ. कालिदास चौधरी यांनी शासनाने सर्वमान्य तोडगा काढावा, असे आवाहन केले.