बस खडली पुलावरून कोसळली, 10 प्रवासी जखमी pudhari photo
परभणी

Bus accident : बस खडली पुलावरून कोसळली, 10 प्रवासी जखमी

जखमी उपजिल्हा रुग्णालयात दाखल

पुढारी वृत्तसेवा

गंगाखेड : तालुक्यातील मसला येथून प्रवासी घेऊन गंगाखेडकडे येणारी बस रस्ता सोडूून खडली पुलावरून घसरली. यात 10 प्रवासी जखमी झाल्याची घटना गुरुवारी (दि.12) सायंकाळी मसला गावाजवळ घडली.

तालुक्यातील मसला येथून गंगाखेडकडे प्रवासी घेऊन येणारी बस क्र एम एच 06 एस 8557 ही गुरुवारी सायंकाळी मसला येथून काही अंतरावर खडली पुलावरून ओढ्यात घसरली. यात बसमधील चालकाच्या शेजारील सीटवरील सारंग मारोती पांचाळ (वय 12) हा समोरील काच फूटूून बाहेर गेला.

मेघा मारोती पांचाळ (वय 39), मारोती प्रल्हाद पांचाळ (वय 50), ऋतुराज तुकाराम पांचाळ (वय 15 रा.मसला ह.मु.पुणे), अंजली दत्तात्रय चौघुले (वय 34), धीरज दत्तराम चौघुले (वय 20 रा.पुणे), मंगलाबाई मारोतराव शिंदे (वय 60), राधाबाई बन्शी शिंदे (वय 50), अराध्या माधव शिंदे (वय 3), विठ्ठल हरिदास नागणे (वय 32 रा.मसला) हे जखमी झाले.

अपघाताची माहिती समजताच शिवाजीराव शिंदे, उमाकांत शिंदे, अनिल शिंदे, हनुमान शिंदे, नीलेश शिंदे, अर्जुन शिंदे, श्यामराव शिंदे, गुणवंत ढगे, पांडुरंग शिंदे, प्रकाश शिंदे, बालासाहेब शिंदे, अप्पाराव कदम, प्रकाश शिंदे, वैजनाथ शिंदे, आदिनाथ शिंदे, मारोतराव शिंदे आदींनी घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढूून ऑटो व खाजगी वाहनातून गंगाखेडला नेले.

108 रुग्णवाहिकेचे चालक विष्णू व्होरे यांनी झोला पाटीहून तिघांना ऑटोतून रुग्णवाहिकेत घेत जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.मोहिनी मुंडे, परिचारिका प्रणीता शिंदे, सुमेधा नागरगोजे आदींनी जखमींवर उपचार केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT