अचानक लागलेल्या आगीत कडबा सुडी जळून खाक झाली. (Pudhari Photo)
परभणी

Parbhani Fire News | आडगाव शिवारात कडबा सुडी जळून खाक; शेतकऱ्याचे मोठे नुकसान

५० हजारांचे आर्थिक नुकसान

पुढारी वृत्तसेवा

पूर्णा : तालुक्यातील पांगरा-पूर्णा या मुख्य रस्त्यावर असलेल्या आडगाव लासिना शिवारात गुरुवारी (दि.१) दुपारी अचानक आग लागून कडबा सुडी जळून खाक झाली. टाळकी ज्वारीच्या अडीच हजार कडबा पेंढ्या आगीत खाक होऊन सुमारे ५० हजार रुपयांचे शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पूर्णा तालूक्यातील पांगरा-वाई या मुख्य रोडवरील प्रसिद्ध बरबडी हनुमान देवस्थान मंदिरा समोरील आडगाव ला. शिवारात बरबडी येथील शेतकरी यादवराव श्यामराव जाधव (वय ६०) यांनी साडेतीन एकर मधील टाळकी ज्वारीचा अडीच हजार पेंढ्या कडबा सुडी रचून ठेवली होती. आज दुपारी १२ च्यादम्यान कडबा सुडी जळत असल्याची माहिती जाधव यांना दिली. गावात लग्न समारंभ असल्यामुळे शेतकरी शेतात नव्हते. हनुमान जाधव, यादवराव जाधव हे ग्रामस्थांसह घटनास्थळी दाखल झाले. तो पर्यंत सुमारे अडीच हजार कडबा पेंढ्यांची जळून राख झाली होती. यात एकूण ५० हजारांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT