आहेरवाडी येथे सर्पदंशाने शेतकऱ्याचा मृत्यू झाला.  Pudhari Photo
परभणी

आहेरवाडी येथे सर्पदंशाने शेतकऱ्याचा मृत्यू

पुढारी वृत्तसेवा

पूर्णा, पुढारी वृत्तसेवा: आहेरवाडी (ता. पूर्णा) येथील तरूण शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू झाला. ही घटना आज (दि. २८) सकाळी ११.३० च्या दरम्यान घडली. सचिन दासराव मोरे (वय २८) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, आज सकाळी सचिन शेतात काम करत होता. यावेळी अचानक त्याच्या उजव्या पायाच्या बोटाला गवतात सर्पदंश झाला. यानंतर त्याला पूर्णा येथे उपचारासाठी नेले असता उपचारा दरम्यान डॉ. विनय वाघमारे यांनी त्यास मृत्यू घोषीत केले.

त्याच्या पश्चात पत्नी, तीन महिन्याची मुलगी, आई - वडील, तीन बहिणी असा परिवार आहे. सचिनच्या अचानक जाण्याने आहेरवाडीत शोककळा पसरली आहे. या घटनेची माहिती शेतकरी छगनराव मोरे यांनी दिली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT