परभणी : शिक्षकांचा विराट महाआक्रोश मोर्चा धडकला

परभणी : शिक्षकांचा विराट महाआक्रोश मोर्चा धडकला
Parbhani News
शिक्षकांचा विराट महाआक्रोश मोर्चा धडकलाpudhari photo
Published on
Updated on

परभणी : शाळा व शिक्षणाच्या संदर्भात शासनाने योग्य निर्णय यांची अंमलबजावणी करावी, या मागणीकरिता सर्व शिक्षक संघटनांच्या समन्वय समितीच्या वतीने बुधवारी (दि.२५) जिल्हाधिकारी कार्यालयावर शिक्षकांचा विराट महाआक्रोश मोर्चा काढण्यात आला. मोर्चात शिक्षकांसह महिला शिक्षिका मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

शासनाने शाळेतील विद्यार्थी संख्येच्या अनुषंगाने शिक्षकांची अट पूर्ववत ठेवावी. द्विशिक्षक ही शाळेमध्ये एक शिक्षक कमी करून कंत्राटी शिक्षक भरती कमी करू नये. १ नोव्हेबर २००५ पासून शिक्षक सेवा बजा बणाऱ्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागण्यांसह ऑनलाईनची कामे शिक्षकांना देऊ नयेत. शालेय पोषण आहार विशेष यंत्रणेमार्फत द्यावा. विशेष निवड श्रेणी ही सर्व शिक्षकांना देण्यात यावी.

त्याचबरोबर शिक्षकांना शिकवू द्यावे आणि विद्याथ्यर्थ्यांना शिकू द्यावे, अशा प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. शासनाने शिक्षकांच्या या मागण्यांबाबत गांभियनि दखल घ्यावी. यासाठी जिल्हाभरातून विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, शिक्षक भरपावसात या महाआक्रोश मोर्चासाठी दाखल झाले होते. शनिवार बाजार येथील मैदानातून नानलपेठ, शिवाजी चौक, गुजरी बाजार, गांधी पार्क, नारायण चाळ, स्टेशन रोडमार्गे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ झालेल्या सभेत मोर्चाचा समारोप झाला. यावेळी विविध संघटनांच्या पदाधिका-यांनी शिक्षकांच्या प्रश्नांबाबत आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या.

मोर्थात जुनी पेन्शन संघटनेचे अशोक रसाळ, शारिरीक शिक्षण शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष रणजीत काकडे, राष्ट्रवादी शिक्षक संघटनेचे परमेश्वर जाधव, मराठवाडा प्रमुख किरण सोनटक्के, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे बी.एम. भांगे, शिक्षक सेनेचे दिगांबर मोरे, शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष किशन इदगे, प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष वसंत इंगोले, कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक पंडित, जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवी लोहट, प्राथमिक शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सोपान बने, पंजाबराव देशमुख शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष गजानन सोळंके, शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष सुनील काकडे यांच्यासह विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकरी सहभागी झाले होते. मोर्चाच्या सभेचे सूत्रसंचालन शिरीष लोहट यांनी केले तर अरुण चव्हाळ यांनी आभार मानले.

एकच मिशनच्या टोप्या

शिक्षकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या जुन्या पेन्शन योजनेवर या महाआक्रोश मोर्चातून लक्ष वेधण्यात आले. एकच मिशन जुनी पेन्शन असे लिहलेल्या टोप्या शिक्षकांनी मोठ्या प्रमाणावर घातल्या होत्या. महिला शिक्षकांचीही मोर्चात असलेली उपस्थिती लक्षणीय होती. शांततेत व शिस्तीत मोठ्या संख्येने असलेला हा मोर्चा लक्षवेधक ठरला,

Parbhani News
Gadchiroli News :धनगर आरक्षणाला विरोध: जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला आदिवासींचा महाआक्रोश मोर्चा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news