जिंतूर : रुग्णालयात काम करत असलेल्या एका तरुणीचा अश्लिल वर्तन करत डॉक्टरने विनयभंग केला. ही घटना ७ जुलै रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास जिंतूर शहरातील ब्रम्हांडनायक हॉस्पिटल येथे घडली. पिडीतेच्या तक्रारीवरून डॉक्टर विरोधात विनयभंग आणि ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान पीडित २२ वर्षीय तरुणी ही मागील महिनाभरापासून ब्रम्हांडनायक रुग्णालय येथे कामाला आहे. दि ७ जुलै सकाळी १० वाजण्याच्या सुमारास तरुणीने डॉक्टरांकडे चेहऱ्यावरील मस काढण्यासाठी उपचार घेण्याकरिता मार्गदर्शन मागितले. यावेळी डॉक्टर कांगणे यांनी तरुणीचा वाईट हेतूने तरुणीचा हात धरून ओढले. तसेच अश्लिल वर्तन करत तरुणीचा विनयभंग केला. घाबरलेली तरुणी घरी आली. तरुणीने घडला प्रकार आईला सांगितला त्यानंतर जिंतूर पोलीस ठाणे गाठत डॉ. कांगणे यांच्या विरोधात तक्रार देण्यात आली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी सदर घटनेचा तपास करत आहे.