Crime News pudhari photo
परभणी

cattle-stealing gang : जनावरे चोरीच्या टोळीचा गुन्हे शाखेकडून पर्दाफाश

१५ गुन्हे उघडकीस; ९ लाखांची रोख रक्कम जप्त, एक आरोपी ताब्यात

पुढारी वृत्तसेवा

Crime Branch busts cattle-stealing gang

परभणी, पुढारी वृत्तसेवा : परभणी शहर व जिल्ह्यातील विविध भागांत जनावरे चोरी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी या टोळीशी संबंधित १५ गुन्हे उघडकीस आणून ९ लाख रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे.

पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या आदेशानुसार जनावरे चोरीच्या गुन्ह्यांचा तपास सुरू असताना मिळालेल्या गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे मुजाहिद ख्वाजा कुरेशी (वय २६, रा. धार रोड, परभणी) यास ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने साथीदारांच्या मदतीने परभणी शहरासह पालम, गंगाखेड, मानवत, पाथरी व चारठाणा परिसरात १५ जनावरे चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

चोरी केलेल्या जनावरांची कत्तल करून मांस विक्रीतून मिळालेली ९ लाख रुपयांची रोख रक्कम आरोपीने पोलिसांकडे हजर केली. ही रक्कम कायदेशीर प्रक्रियेनुसार जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणात शेख अकबर शेख शौकत (रा. भिवंडी, ह.मु. जिंतूर), नदीम (रा. सेलू) आणि अशफाक (रा. सेलू) हे तीन आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. ताब्यातील आरोपी मुजाहिद कुरेशी यास पुढील तपासासाठी परभणी ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, अपर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तसेच तांत्रिक सहाय्यक सपोउपनि बालाजी रेड्डी यांनी कारवाईत सहभाग घेतला. १५ गुन्हे उघडकीस आणि ९ लाखांची रोकड जप्त झाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या या कारवाईचे कौतुक होत आहे.

९ लाखांची रोकड हस्तगत

परभणी शहरासह पालम, गंगाखेड, मानवत, पाथरी व चारठाणा परिसरात जनावरे चोरी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. मुजाहिद ख्वाजा कुरेशी (वय २६) याला ताब्यात घेत चौकशी केली असता १५ जनावर चोरीचे गुन्हे उघडकीस आले. चोरीच्या जनावरांची कत्तल करून मांस विक्रीतून मिळविलेली ९ लाख रुपयांची रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली. या प्रकरणातील शेख अकबर शेख शौकत, नदीम व अशफाक हे तीन आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT