Parbhani Crime News : एसटी बसमध्ये बसू न दिल्याने वाहकाला मारहाण, चालकाला शिवीगाळ, एकावर गुन्हा दाखल  Parbhani Crime News
परभणी

Parbhani Crime News : एसटी बसमध्ये बसू न दिल्याने वाहकाला मारहाण, चालकाला शिवीगाळ, एकावर गुन्हा दाखल

मानवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून संबंधित व्यक्‍तीला अटक करण्यात आली आहे.

पुढारी वृत्तसेवा

Conductor assaulted by a person for not allowing him to sit in ST bus

मानवत : पुढारी वृत्तसेवा

थांबा नसलेल्या ठिकाणी एसटी बसमध्ये का बसू देत नाही. या कारणावरून बस वाहकाला अश्लील भाषेत शिवीगाळ व बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली. तसेच मदतीस आलेल्या चालकास शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.

या प्रकरणी सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याबद्दल मानवत शहरातील एका इसमाविरुद्ध येथील पोलीस ठाण्यात (शनिवार) ता 14 रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव संतोष उर्फ सुनील दत्ता भदर्गे राहणार आंबेडकर नगर मानवत असे असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पाथरी आगाराची बीड ते परभणी ही बस ( क्रमांक एम एच 20 बी एल 1122 ) परभणी कडे जात होती. रेल्वे येत असल्यामुळे मानवत रोड येथील रेल्वे गेट बंद असल्याच्या कारणाने रेल्वे गेटच्या अलीकडे शनिवारी ता 14 रात्री 8 च्या सुमारास ही बस थांबली होती. यावेळी संतोष भदर्गे याने एसटीमध्ये बसू द्या असे सांगितले.

यावर वाहक बाबासाहेब आडे यांनी या ठिकाणी एसटी बसला थांबा नाही. तुम्हाला मागच्या स्‍टॉपचे तिकीट घ्यावे लागेल. तुम्ही समोरील बस स्टॉप वरून बसा असे सांगितले. संतोष याने बसचे दार उघडून आत येत मी इथूनच बसणार असे म्हणत शिवीगाळ करून वाहकाला गाडीच्या खाली ओढून जमिनीवर पाडले. हातातील तिकीटाचे मशीनने तोंडावर, कानावर व डाव्या हातावर मारून गंभीर दुखापत करून मशीन फेकून दिली. बस चालक सुरेश साठे भांडण सोडविण्यासाठी आले असता त्यांनाही शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

या प्रकरणी मारहाण करणारा संतोष भदर्गे यास वाहक, चालक व इतरांनी धरून येथील पोलीस ठाण्यात आणून पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक दिगंबर पाटील हें करीत आहेत. या मारहाणीत जखमी झालेल्या वाहकावर परभणी येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT