जिल्हाभरात छत्रपती शिवाजी महाराज जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरी file photo
परभणी

जिल्हाभरात छत्रपती शिवाजी महाराज जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरी

ठिकठिकाणी भव्य मिरवणुका, लहान मुलांसह महिलांचाही लक्षणीय सहभाग; शिवरायांच्या वेशभूषेतील मुलांनी वेधले लक्ष

पुढारी वृत्तसेवा

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti celebrated with enthusiasm with various programs across the district

परभणी, पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती गुरुवारी (दि.१९) जिल्हाभरात विविध उपक्रमांनी साजरी करून अभिवादन करण्यात आले.

जिल्हा कचेरीत अभिवादन

परभणी : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा डालकरी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

चावेळी उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले, जिल्हा पुरवठा अधिकारी विलास मुसळे, नायब तहसीलदार प्रशांत पाकोडकर, सतीश रेड्डी, मधुकर क्षीरसागर, राजकुमार राठोड, वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी इप्पर, सहायक महसूल अधिकारी सुरेश पुंड, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

विवेकानंद विद्यालयात अभिवादन

सेलू: शहरातील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई संचालित विवेकानंद प्राथमिक विद्यालयात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी रागिणी जकाते, गजानन साळवे, विजय चौधरी, दीपाली पवार, शारदा पुरी, दीपाली रोहिणकर, आश्विनी पावसे उपस्थित होते.

फेकेएम. कॉलेजात शिवजयंती

मानवत येथील के. के. एम. महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी झाली. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. भास्कर मुंडे होते, यावेळी मूल्यशिक्षण समित्तीप्रमुख डॉ. पंडित मोरे, आयक्यूएसीप्रमुख डॉ. कैलास बोरुडे, गणेश उबाळे उपस्थित होते. प्रा. सोळके यांनी विद्याध्यर्थ्यांना संबोधित केले. डॉ. शारदा राऊत यांनीही मार्गदर्शन केले. डॉ. भास्कर मुंडे यांनी शिवाजी महाराजांच्या कार्याचा आदर्श विद्याथ्यांनी जीवनात अंगीकारावा, असे म्हटले. सूत्रसंचलन व आभार प्रा.एस.वी. घनवट यांनी केले. कार्यक्रमास प्रा. संजय डाळकरी, प्रा. शेख मन्सूर, डॉ. संदीप गिरासे, डॉ. योगेश बागूल योगेश, डॉ. पंकज चाळीकवार, प्रा. विनोद हिबारे, प्रा. अशोक फाकडे, प्रा. बाळासाहेव भिसे, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

नूतनमध्ये शिवरायांना अभिवादन

सेलू: येथील नूतन विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांना ३९६ व्या जयंतीनिमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी सहावीतील विद्यार्थी स्वराज सोंबे याने छत्रपती शिवरायांच्या जीवन कार्यावर मत मांडले. वाप्रसंगी मुख्याध्यापक संतोष पाटील, उपमुख्याध्यापक किरण देशपांडे, पर्यवेक्षक शंकर बोधनापोड, बाबासाहेब हेलसवर, भगवान देवकते, राजेंद्र सोनवणे, सुनिता सांगुळे, सांस्कृतिक विभागप्रमुख शिल्पा बरडे, सहविभागप्रमुख डॉ. सुरेश हिवाळे, संतोष क्षीरसागर, विशाल क्षीरसागर, सशांक पांडे, आरती कदम, सच्चिदानंद डाखोरे, व्यंकट तोरणाळे, सुनील तोड़कर, सुनीता दायमा, सुशील कुलकर्णी उपस्थित होते. सुत्रसंकलन व आभार सांस्कृतिक सहविभाग प्रमुख डॉ. काशिनाथ पल्लेवाड यांनी केले.

राजर्षी शाहू कॉलेजात अभिवादन मानवत : येथील राजर्षी शाहू कनिष्ठ महाविद्यालय येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य संतोष पवार होते. कार्यक्रमास उपप्राचार्य शिवशक्ती कावळे, प्रा. अनुसया काळे, सुनीता दमाने, दैवशाला कुकडे, निर्मला सरवदे, श्रीमती पारखे, प्रा. गोविंद रासवे, काशिनाथ जाधव, मुंजाजी कांबळे, भगवान घाटूळ, गोविंद पाटील उपस्थित होते.

ताडकळसला शिवजन्मोत्सव

ताडकळस : शहरात सार्वजनिक शिवजयंती उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा झाला. सकाळपासूनच शहरातील विविध ठिकाणांसह बसस्टैंड, मोडा परिसरात ढोल-ताशांच्या गजरात, भगव्या पताकांनी सजलेल्या बातावरणात जय जिजाऊ, जय शिवरायांच्या घोषणांनी वातावरण दुमदुमले. शिवरायांच्या प्रतिमेस मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी सरपंच गजानन आंबोरे, जि.प. सदस्य संजय जल्हारे, बाजार समिती माजी सभापती रंगनाथ भोसले, तंटामुक्तीचे अध्यक्ष सुधाकर आंबोरे, ग्रा.पं. सदस्य दिलीप आंबोरे, माजी सरपंच सुधाकर आंबोरे, प्रकाश फुलबरे, राजेंद्र मगरे, दिपक आंबोरे, सोसायटी संचालक प्रल्हाद होणमने, व्यापारी सत्यनारायण मुंदडा, कैलास मुंदडा, पत्रकार मदनराव आंबोरे, हरीनारायण आंबोरे, संचालक नरहरी रुद्रवार, सखाराम लासे, शिवसेना युवा शहर प्रमुख मनोहर हजारे, अनिल नरवटे, धनवटे उपस्थित होते. दरम्यान शिवचरित्रावर आधारित भाषणे, पोवाडे व सांस्कृतिक सादरीकरण झाले, परभणी टी पॉइंट चौकात छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारावा अशी मागणी नागरिक व युवकांनी केली. गजानन आंबोरे यांनी १ वर्षात अश्वारूढ पुतळा उभारण्याचे काम हाती संण्यात येईल असे सांगितले.

महात्मा गांधी महाविद्यालय, झरी झारी: येथील महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. इस्री: महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयात अभिवादन करताना मान्यवर. यावेळी प्राचार्य बाळासाहेब देवकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन झाले. मुख्याध्यापक विष्णु गावंडे, ची. व्ही. कदम, प्रा. संपत पांडरपोटे, प्रा. परशुराम भोसले, प्रा. बालाजी हिवरे, प्रा. डी. बी. पवार, प्रा. अव्यैण टाले, प्रा. प्रल्हाद सोळंके, प्रा. दत्ता जगताप, प्रा. नामदेव सोनवणे, प्रा. रेणुका भवर, प्रा. अर्चना कांबळे, रंगनाथ राठोड, राम भोसले, भानुदास जाधव, राजू शिंपले, सिध्देश्वर गोंग, दामोधर गायकवाड, रामदेव वईद, विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचलन प्रा. हिवरे तर आभार सोनवणे यांनी मानले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT