ST Bus Accident : नांदेड - गंगाखेड राष्ट्रीय महामार्गावर बस पलटली; १६ प्रवासी जखमी File Photo
परभणी

ST Bus Accident : नांदेड - गंगाखेड राष्ट्रीय महामार्गावर बस पलटली; १६ प्रवासी जखमी

नांदेड - गंगाखेड राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी रात्री सुमारे १० वाजता एका भीषण अपघातात एसटी महामंडळाची बस पलटी झाली.

पुढारी वृत्तसेवा

Bus overturns on Nanded-Gangakhed National Highway; 16 passengers injured

परभणी, पुढारी वृत्तसेवा : नांदेड - गंगाखेड राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी रात्री सुमारे १० वाजता एका भीषण अपघातात एसटी महामंडळाची बस पलटी झाली. या अपघातात एकूण १६ प्रवाशी जखमी झाले असून त्यापैकी चारजण गंभीर अवस्थेत आहेत. नांदेड पुणे मार्गावरून येत असलेली बस क्रमांक एमएच १४ केक्यु ९७६१ ही पालम ते गंगाखेड या मार्गावर मालेवाडी येथे एकतर्फी रस्त्याचे काम सुरू असताना रस्त्याच्या बाजुला जाऊन खड्ड्यात पडल्याने पलटी झाली.

बस चालकाने वेळीच नियंत्रण ठेवल्यामुळे १६ प्रवाशांचे प्राण वाचले. गंभीर जखमींमध्ये सुरेखा बजाज, रत्नमाला सावळे, नामदेव राठोड आणि अमोल माने यांचा समावेश आहे. त्यांना डोके, पाय, हात आणि कंबरेवर गंभीर दुखापत झाली असूना परभणी येथे उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.

उर्वरित १२ जखमी प्रवाश्यांचा उपचार गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात सुरु आहे. जखमी प्रवाश्यांमध्ये लोहा, वाशिम, बोथी, कळमनुरी, परळी, पुणे आणि नांदेड या शहरातील नागरिक आहेत. बसचालक आणि सहाय्यकाने तत्काळ कृती करून प्रवाश्यांचे प्राण वाचवले.

अपघाताबाबत स्थानिक पोलिसांनी तातडीने नोंद करून पुढील चौकशी सुरु केली आहे. ही घटना राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याच्या कामाच्या दरम्यान घडल्यामुळे प्रवाश्यांनी अधिक काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे स्थानिकांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT