

Manwat woman death
मानवत : दुकानात असलेल्या साड्यांची व कपड्यांची विक्री होत नसल्याच्या कारणावरून आलेल्या नैराश्यातून एका 37 वर्षीय महिला व्यापाऱ्याने दुकानातच साडीने गळफास घेऊन जीवन संपविले. ही दुर्दैवी घटना गुरुवारी (दि. 20) सकाळी आठ ते दहाच्या दरम्यान शहरातील खंडोबा रोडवर घडली.
शिल्पा रवींद्र करपे (वय 37) असे मृत विवाहितेचे नाव असून त्यांचे खंडोबा रोडवर साड्याचे व कपड्यांचे दुकान आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की. शिल्पा करपे यांचे खंडोबा रोडवर साड्यांचे आणि कपड्यांचे दुकान आहे. दरम्यान, साड्यांची विक्री होत नसल्याने त्या नैराश्यात होत्या. आज त्यांनी दुकानांमध्येच गुलाबी रंगाच्या साडीने गळफास घेतला. याबाबत त्यांचे पती रवींद्र लक्ष्मणराव करपे (वय 42) यांनी दिलेल्या माहितीवरून येथील पोलीस ठाण्यात सायंकाळच्या सुमारास आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनास्थळी पोलीस निरीक्षक संदीप बोरकर व त्यांच्या पथकाने धाव घेतली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहे.