परभणीतील बेपत्ता युवकाचा मृतदेह विहिरीत आढळला  file photo
परभणी

Parbhani Crime News : परभणीतील बेपत्ता युवकाचा मृतदेह विहिरीत आढळला

बेपत्ता झालेल्या युवकाचा मृतदेह तब्बल तीन दिवसांनी आढळल्याने खळबळ उडाली.

पुढारी वृत्तसेवा

Body of missing youth from Parbhani found in well

मानवत पुढारी वृत्तसेवा परभणी जिल्ह्यातील आर्वी येथील एका सत्तावीस वर्षीय बेपत्ता झालेल्या युवकाचा मृतदेह तब्बल तीन दिवसांनी मानवत तालुक्यातील मंगरूळ बुद्रुक येथील शिवारातील एका विहिरीत सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

मुंजा उर्फ बाळू कदम असे (27 वर्षीय) युवकाचे नाव असून तो परभणी तालुक्यातील आर्वी येथील रहिवाशी आहे. मंडप डेकोरेशनच्या कामाच्या निमित्ताने तो मानवत तालुक्यातील मंगरूळ बुद्रुक येथे 21 एप्रिल रोजी सकाळी आला होता. काम झाल्यानंतर मानवत तालुक्यातील भोसा येथे मामाच्या गावाला जाऊन येतो असे सांगून तो गायब झाला होता.

नातेवाईकांनी शोध घेऊनही सदरील युवकाचा शोध न लागल्याने त्याचा भाऊ गोविंद कदम याने पोलीस ठाण्यात धाव घेत मुंजा कदम हरवल्याची तक्रार 22 एप्रिल रोजी दाखल केली होती. शेवटी शुक्रवारी ता. 24 दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील मंगरूळ बुद्रुक येथील एका शिवारातील विहिरीत एक जणाचा मृतदेह आढळून आला.

नातेवाईकांनी तो मृतदेह मुंजा कदमचा असल्याचे ओळखले. सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास येथील ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक अनिल खिल्लारे, नारायण घोरपडे, राहुल मोरे व दिपक बेंडे यांनी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणी येथील पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास राहुल मोरे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT