पूर्णा, पुढारी वृत्तसेवा: नांदेड - पूर्णा रस्त्यावरील गौर गावानजीक कार व मोटारसायकलची समोरासमोर जोरदार धडक झाली. यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत. ही घटना गुरूवारी (दि. १०) सायंकाळी घडली. (Parbhani Accident News)
याबाबत अधिक माहिती अशी की, गुरुवारी सायंकाळी ७ च्या दरम्यान नांदेडकडून पूर्णा कडे जाणाऱ्या कारची (एम एच २६ व्ही ९५९९) पूर्णेहून चुडावाकडे जाणाऱ्या मोटारसायकलशी (एम एच २६ बीटी २०६६) समोरासमोर धडक झाली. यात नांदेड वसरणी येथील दुचाकीस्वार नागेश मोरे (वय ३५) यांच्या उजव्या पायाला मोठी दुखापत झाली. पायाची पाचही बोटे तुटून पडली. गंभीर जखमी अवस्थेत त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, चुडावा पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.