Parbhani News : ८८ लाखांची दारू लंपास प्रकरणातील अटक आरोपींना जामीन मंजूर  Pudhari File Photo
परभणी

Parbhani News : ८८ लाखांची दारू लंपास प्रकरणातील अटक आरोपींना जामीन मंजूर

बनावट अपघाताच्या माध्यमातून ८८ लाख रुपयांची विदेशी दारू लंपास झाल्याचे प्रकरण जिंतूर तालुक्यात तथाकथितरित्या घडले होते.

पुढारी वृत्तसेवा

Bail granted to accused arrested in liquor lampass case worth Rs 88 lakh

जिंतूर, पुढारी वृत्तसेवा : बनावट अपघाताच्या माध्यमातून ८८ लाख रुपयांची विदेशी दारू लंपास झाल्याचे प्रकरण जिंतूर तालुक्यात तथाकथितरित्या घडले होते. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींना, परभणी येथील माननीय जिल्हा व सत्र न्यायालयाने दि. १८ ऑक्टोबर २०२५ रोजी जामिनावर सोडण्याचे आदेश दिले. आरोपींच्या वतीने अॅड. सुनिल बुधवंत यांनी प्रभावी बाजू मांडली.

या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, ३१ ऑगस्ट २०२५ रोजी नाशिक येथील मद्य कंपनीतून नांदेड येथील वाईन शॉप निघालेल्या ट्रकमध्ये (क्रमांक एमएच १५ जीव्ही १७३५) १ कोटी ३९ लाख रुपयांची विदेशी दारू भरलेली होती. जिंतूर तालुक्यातील चिंचोली दराडे शिवारात ट्रकचा अपघात झाल्याचा बनाव करून ८८ लाख १७ हजार ८२९ रुपयांची दारू चोरी झाल्याने, कंपनीच्या प्रतिनिधीने ८ सप्टेंबर रोजी जिंतूर पोलीस ठाण्यात ट्रक चालक प्रभाकर विश्वनाथ घुगे याच्या विरुद्ध फिर्याद देत गुन्हा नोंद केला होता.

त्यानंतर, जिंतूर पोलिसांनी ट्रक चालकास पुणे येथून ताब्यात घेतले आणि तीन आरोपी नामे अनिल शिवाजी चव्हाण, रविंद्र हरिभाऊ पवार आणि सचिन अशोक सोळंके यांना दि. २६ सप्टेंबर रोजी अटक केली होती. या तीन आरोपींच्या माध्यमातून पोलिसांनी ६५ लाख ३९ हजार ७२० रुपयांची दारू जप्त केल्याचा दावा केला होता.

यानंतर, पोलिसांनी जवळपास मकोका सारखेच असणारे संघटित गुन्हेगारी टोळी बाबतचे कलम १११ लावले होते, यामुळे प्रकरणाची गंभीरता वाढली होती. त्यामुळे, आरोपींना ८ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर, जितूर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी या तीन आर ोपींना न्यायालयीन कोठडीत घेत आरोपींची परभणी येथील जिल्हा कारागृहात रवानगी केली होती.

तदनंतर, आरोपींनी परभणी येथील जिल्हा सत्र न्यायालयात अॅड. सुनील बुधवंत यांच्या मार्फत जामिनावर सोडण्यासाठीचा अर्ज दाखल केला होता. या अर्जावर सुनावणी दरम्यान अॅड. सुनील बुधवंत यांनी आरोपींच्या बाजूने सखोल युक्तिवाद करत त्यांची ठोस बाजू मांडली, जिंतूर पोलिसांतर्फे तपासी अधिकाऱ्यांनी हजर होऊन त्यांचे म्हणणे मांडले व सरकारी वकिलांनी युक्तिवाद केला. सर्व बाजू ऐकल्यानंतर, मा. न्यायालयाने तीनही आरोपींना जामिनावर सोडण्याचे आदेश दिले. अॅड. सुनील बुधवंत यांना या प्रकरणात अॅड. भगवान घुगे आणि अॅड. नरेश गव्हाणे यांनी सहकार्य केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT