जिल्हाधिकारी रघुनाथ गावंडे यांनी 'डोंगरी' मागण्यांना मंजुरी दिली. Pudhari Photo
परभणी

'डोंगरी' मागण्यांना अखेर प्रशासनाची मंजुरी

पुढारी वृत्तसेवा

गंगाखेड : गत २६ दिवसांपासून तहसील कार्यालयासमोर तालुक्याच्या डोंगरी भागातील विविध मागण्यांसाठी डोंगरी जन परिषदेचे 'एक गाव, एक दिवस' असा सत्याग्रह सुरू आहे. सोमवारी (दि.१४) रोजी सायंकाळी उशिरा अखेर आमदार रत्नाकर गुट्टे यांनी जिल्हाधिकारी रघुनाथ गावंडे यांचेसोबत डोंगरी जनपरिषदेचे संस्थापक अध्यक्ष पंडित घरजाळे यांचेसह उपोषणकर्त्यांची बैठक घडवून आणली.

'डोंगरी' मागण्यांना प्रशासनाने मंजुरी दिल्यानंतर २६ दिवसांच्या डोंगरी सत्याग्रहाच्या समाप्तीचा निर्णय झाला. गंगाखेड तालुक्यातील डोंगराळ परिसर डोंगरी भाग जाहीर करावा डोंगरी भागाच्या जनतेची डोंगरी भागाचा सुदूर केंद्रामार्फत सर्वेक्षण करून सर्वेक्षण अंती समाविष्ट गावांचा प्रस्ताव डोंगरी भाग विकास उप समिति कडे पाठवण्यात यावा या मागणीसाठी डोंगरी जन परिषदेचे संस्थापक अध्यक्ष पंडित घरजाळे यांच्या नेतृत्वाखाली अंगत २६ दिवसांपासून एक गाव एक दिवस या तत्त्वावर तहसील कार्यालयासमोर सत्याग्रह सुरू आहे.

सोमवारी अखेर आ. गुट्टे यांनी सत्याग्रहाच्या मागणी पूर्ततेसाठी उपोषणकर्त्यांची जिल्हाधिकाऱ्यांसमवेत बैठक घडवून आणली. जिल्हाधिकाऱ्यांसमवेत झालेल्या शिष्टमंडळाच्या चर्चेत रिमोट सेन्सिंग सुदूर उपाययोजना केंद्र नागपूर यांच्याकडे समाविष्ट गावांचा प्रस्ताव पाठवून सर्वेक्षण करून समाविष्ट गावांचा प्रस्ताव पाठविण्याचे लेखी आश्वासन देण्यात आल्याचे उपो षणकर्ते तथा डोंगरी जन परिषदेचे संस्थापक अध्यक्ष पंडित घरजाळे व समितीचे सर्व संयोजक यांनी 'पुढारी'शी बोलताना सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT