265 Anganwadis in the district will be made smart this year
परभणी, पुढारी वृत्तसेवा महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत राज्यातील अंगणवाडचांच आधुनिकीकरण करण्यासाठी स्मार्ट अंगणवाडी किट खरेदीस राज्य शासनाने मान्यता दिली. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील सुमारे २६५ अंगणवाडी केंद्रांना मंजुरी देण्यात आली असून, या केंद्रांचे रूपांतर आदर्श आणि अत्याधुनिक सुविधांनी युक्त स्मार्ट अंगणवाड्यांत करण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालविकास राज्यमंत्री तथा पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिली.
मुलांच्या सर्वांगिण विकासासाठी शिक्षण, आरोग्य आणि पोषण या तिन्ही घटकांचा समन्वय साधणारी स्मार्ट अंगणवाडी ही एक नवी क्रांती ठरणार आहे. स्मार्ट अंगणवाडी योजनेमुळे जिल्हयातील लहान मुलांना सुरक्षित, स्वच्छ आणि आनंददायी शिक्षणाचे वातावरण उपलब्ध होईल. मुलांच्या सर्वांगीण विकासासोबतच महिलांच्या सक्षमीकरणासाठी ही योजना महत्त्व पूर्ण ठरणार आहे. जिल्ह्यासाठी ही गौरवाची बाब असून २६५ अंगणवाड्या स्मार्ट होणार आहेत असे सांगितले. जिल्हयातील स्मार्ट
होणाऱ्या अंगणवाड्यांत परभणी तालुक्यातील पारवा क्र.२, ३, उमरी क्र.२, बोरवड बु क्र. १, कास्टगाव, पेडगाव क्र.१, ब्राम्हणगाव क्र.१, ३, ४, मांडाखळी क्र. ३, साटला, झरी क्र.९, ६, सावगी खु. १,२, टाकळी क्र.६, संबर क्र.२, मांगणगाव क्र.२, नांदखेडा क्र. २, कोटमवाडी, कैलासवाडी, सायला (ख.) १, पिंपरी क्र.३, पाथरा क्र.२, पोखर्णी क्र.७, ४, तामसवाडी, आंबेटाकळी क्र. १, ताळपांगरी क्र. १. सिंगणापूर क्र.१, पिंगळी क्र.८, ब्रह्मपुरी क्र. १, २, साळापुरी क्र. २, दैठणा क्र.८, पेडगाव, तरोडा, पिंपळगाव समी, आर्वी, पेगरगव्हाण, माळसोना, इंदेवाडी, कार्ला, सेलू तालुक्यात डासाळा क्र.२. राधे धामणगाव, डासाळा क्र.२, डेंगळी पिंपळगाव क्र.२, गोमवाकडी, गोहेगाव, करडगाव, कवडधन, डिग्रस खु., वाकी, पिंपराळा, वाई क्र.१, वालूर क्र.२, ४, १०, हातनूर क्र. २, बोरगाव जहांगीर, हट्टा, कुपटा क्र.१, रावा, सिमणगाव क्र.२, १, निरवाडी खु., निरवाडी बु., कुंभारी, हिस्सी, गुगळी धामणगाव, धनेगाव, मोरेगाव, शिंदे टाकळी, शेलवाडी, निपाणी
टाकळी, बोरकीनी, तिडी पिंपळगाव, शिराळा, आहेर बोरगाव, राजवाडी, आडगाव दराडे, काजळी रोहिना, वलंगवाडी, केमापूर, पिंपरी खु., पिंपरी बु., माले टाकळी. जिंतूर तालुक्यात कुंभारी, दुधगांव क्र. १, कौसडी क्र.७, धानोरा (बु) क्र.१,२, वरुड (नू) क्र.२, ३, कौसडी क्र.५, चारठाणा क्र.७, ४, नागनगाव, कडसावंगी, आडगाव (बा) क्र.१, जवळा (खु), कोक क्र. १, २, मुडा क्र. १, हनवतखेडा, आसेगाव क्र.२, करवली, माथला, सोन्ना, इटोली क्र.२, जोगवाडा क्र.३, सोनापुर क्र. १, रिडज क्र. १, पिंपळगाव गायके क्र.१, दुधनगाव, चामणी, चिंचोली काळे, पोखर्णी तांडा, दहेगाव क्र.१, वडाळी, सावंगी (म्हा) क्र. १, हिवरखेडा, भोसी क्र.१, चौधरणी, कसर, सोरजा क्र. १, मानधनी, वाघी था., कोठा, बामणी बु., निवळी बु., गणपुर, हलविरा, मानकेश्वर (चा), डोहरा, गोंधळा, शेक, अकोली, माक, सावरगाव, सोस, येसेगाव, बलसा, पूर्णा तालुक्यात वझर क्र.१,
कळगाव क्र. १, गौर क्र. ३, धनगर टाकळी क्र.१, आलेगाव क्र. १, हिवरा क्र.१, पिंपळा लॉखडे, रुज क्र.१, कानडखेडा क्र.१, कान्हेगाव क्र.१, ताडकळस क्र.३, हटकरवाडी, कानडखेडा, फुकटगाव, एरंडेश्वर क्र.१, ४, कातनेश्वर क्र.४, मानवत तालुक्यात आटोळा, कोथाळा क्र.१, २, सावंगी मगर क्र.२, गोगलगाव क्र.२, देवलगाव क्र.१, रुढी क्र.२, केकरजवळा क्र.१, २, खडकवाडी, रत्नापूर, रामेटाकळी क्र.१, रामपुरी क्र.१, हाटकरवाडी क्र.१, लोहरा क्र.१, मंगरुळ पा.प क्र.४, इटाळा ब्र, खरबा, रामपुरी बु., वांगी, थार, वझुर बु., हमदापुर, हटकरवाडी, रामेटाकळी, जांब, हसनापूर, शहापूर, गंगाखेड तालुक्यातील धारखेड क्र.१, धारासूर क्र. ३, सायाळा क्र.२, खंडाळी क्र.२, मरडसगाव क्र.१, बोर्ड क्र.२, कोद्री क्र.१,२, माखणी क्र.३, बडवणी क्र.२. इसाद क्र.५, महातपुरी क्र.५, खळी, डोंगरगाव, अकोली, मानकादेवी, तांदुळवाडी, बडवणी, सांगळेवाडी, भेंडेवाडी, सालमोहा, डोंगरजवळा, माखणी, खंडाळी, वाथा, बलवाडी, कासारवाडी, ढवळकेवाडी, महातपुरी, वनपिंपळा, पांगळा,
सोनपेठ तालुक्यात डिघोळ क्र.४, धामोनी क्र.१. वाघलगाव, थडीउक्कडगाव, गंगापिंप्री, वाडी पिंपळगाव, शेळगाव क्र.३, २, नरवाडी क्र. १, निळा क्र.१, वंदन क्र.१. करम तांडा, चतुर नाईक तांडा, उखळी क्र. २, पोहंडूळ, पोहंडूळ तांडा, बनवाडी, पाथरी तालुक्यात गोपेगाव क्र.१. कासापुरी, लिंबा क्र.४, देवनांद्रा क्र.४, रेनापुर क्र. १, तूरा क्र.१, टाकळगव्हाण, हादगाव क्र.२, रामपूरी क्र. ३, मरडसगाव क्र. १, बाभळगाव क्र.४, विटा क्र.१, खेर्डा क्र.१, बाभळगाव क्र.२, पालम तालुक्यातील फरकंडा क्र. १. गुळखंड, आरखेड क्र.१, फळा क्र.१, पेठशिवनी क्र. ३, सातेगाव क्र.१, शेखराजुर क्र.२, पेठपिंपळगाव क्र. ३, वनभुजवाडी, आडगाव, नाव्हलगाव, चाटोरी क्र.४, बदरवाडी, खड़ी क्र. १, तांदुळवाडी क्र. १, पेंडू खु. क्र. १ यांचा समावेश आहे. दरवर्षी १०० अंगणवाडी यात निवडल्या जातात.
प्रत्येक अंगणवाडीत शिक्षण, आरोग्य, पोषण, आहार, स्वच्छता व बालसंगोपनासाठी आवश्यक अत्याधुनिक साहित्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. यामुळे अंगणवाडी केंद्रांत मुलांसाठी आनंददायी, सुरक्षित आणि शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यास मदत होईल. जिल्ह्यातील परभणी, सेलू, जितूर, पूर्णा, मानवत, गंगाखेड, सोनपेठ, पाथरी, पालम या सर्व तालुक्यांतील अंगणवाड्या योजनेत समाविष्ट आहेत. यामुळे ग्रामीण बालकांना दर्जेदार शिक्षण, पोषण आणि आरोग्यसेवा मिळणार असून स्थानिक अंगणवाड्या आधुनिक शिक्षण व आरोग्य विकासाचे केंद्र म्हणून विकसित होतील. या प्रकल्पामुळे बालकांच्या वाढीचा, आरोग्याचा व पोषणस्थितीचा मागोवा घेण्यासाठी डिजिटल साधनांचा वापर होईल. महिला व बालविकास विभाग राज्यातील अंगणवाड्या सुसज्ज, आकर्षक आणि कार्यक्षम बनविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असून स्मार्ट अंगणवाडी योजना ही बालकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासनाने उचललेले अत्यंत महत्त्वाचे आणि दूरदृष्टीचे पाऊल ठरणार आहे.