मराठवाडा

परभणी : माखणी व डोंगरगावात वीज पडून दोन बैलांचा मृत्यू

मोनिका क्षीरसागर

परभणी; पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील डोंगरी भागात शनिवारी (दि.०४) सायंकाळी झालेल्या विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने झोडपले, असता जोेरदार विजांचा कडकडाट होता. दरम्यान तालुक्यातील माखणी व डोंगरगावात सायंकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास वीज पडून शेतकऱ्यांच्या दोन बैलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली, याची नोंद तालुका प्रशाळेमध्ये झाली आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, शनिवारी सायंकाळी ५ ते ६ वाजेपासून शहरासह तालुकाभर ढगाळ वातावरण होते. तालुक्यातील डोंगरी भागातील माखणी, अंतरवेली, अकोली, खादगावचा परिसर, डोंगरगाव (शे) सिरसम, बडवणी आदी भागात वादळ वाऱ्यासह विजेच्या गडगडाटासह पाऊस कोसळत होता. तालुक्यातील माखणी येथील शेतकरी रामराव एकनाथ चव्हाण (गट क्र.२५१) यांच्या शेतात बैलांवर सायंकाळी ७.३० वाजता वीज पडून यामध्ये एका बैलाचा मृत्यू झाला आहे. तसेच डोंगरगाव (शे) येथील शेतकरी निवृत्ती दिगंबर सोन्नर यांच्या शेतात बांधलेल्या बैलावर वीज पडून बैल दगावल्याच्या घटना घडल्या.

दरम्यान या बाबतीत तालुका प्रशाळा पशुधन अधिकारी कार्यालयाने या घटनेची नोंद घेतली आहे. रविवारी (दि.०५ जून) सकाळी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच तलाठी व मंडळ अधिकारी यांनी पंचनामा करण्यासाठी घटनास्थळी पोहोचले आहेत.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT