चारठाणा (जि. परभणी) : पुढारी वृत्तसेवा : चारठाणा येथील पेठ विभागातील विठ्ठल रुख्मिणी मंदिर संस्थान परिसरातील श्री संत सावता महाराज मंदिर संस्थान मंदिरात पालखी मिरवणूक सोहळा झाला. दि. २० जुलै ते २७ जुलैपर्यंत श्री संत शिरोमणी सावता महाराज यांची ७२७वी पुण्यतिथी आणि नामदेव महाराज पुण्यतिथीनिमित्त पालखी काढण्यात आली.
बुधवार, २७ जुलै रोजी सकाळी ९ वाजता सावता महाराज यांची पालखी टाळ, वीणा, मृदंग आणि हरिनामाच्या गजरात भजन करत अनेक भक्तांनी पावल्या खेळल्या. तसेच फुगडी खेळत आनंद घेत ही मिरवणूक मंदिर ते माळी गल्लीतून ते बसवेश्वर चौक ते मेन रोड बाजार मैदानातून ग्रामपंचायत कार्यालय ते परत मंदिरात या पालखीचे विसर्जन करण्यात आले.
या पालखी सोहळ्यात येथील हभप विष्णुदास नामदेव महाराज ढवळे चार ठाणकर, सावता महाराज मंदिर संस्थान अध्यक्ष भगवानराव राऊत, प्रभाकर चव्हाण, नानासाहेब राऊत, भगवानराव सोनटक्के, पंजाबराव काळे हलविरा, ओमप्रकाश लोखंडे, संतोष काळे, सदाशिव देशमुख, जगन्नाथ क्षीरसागर, शाहीर रघुनाथ क्षीरसागर, रामभाऊ डाके, सुभाष घाटुळ, विठ्ठल घाटुळ, ज्ञानेश्वर चव्हाण महाराज, ऊत्तम राऊत, ज्ञानेश्वर कटारे, विश्वनाथ काळे, विष्णु वानखरे, आसाराम आवचार, डिंगाबर लोखंडे, सुभाष राऊत, अर्जुन कटारे, दत्ता ऊगले, ज्ञानेश्वर रासवे यांनी सहभाग नोंदवला होता.
हेही वाचा: