मराठवाडा

परभणी : घागरा येथील पाझर तलाव फुटला

मोहन कारंडे

चारठाणा; पुढारी वृत्तसेवा : शनिवारी झालेल्या मुसळधार पावसाने जिंतूर तालुक्यातील घागरा येथील पाझर तलाव फुटला. यामुळे तलावालगतच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तलावाच्या भिंती जीर्ण झाल्याने तलाव फुटला असल्याचे सरपंच रामकिशन बल्लाळ यांनी सांगितले.

घागरा येथे सीताबाई रामभाऊ राठोड यांच्या शेतात पाझर तलाव आहे. शनिवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास मुसळधार पाऊस सुरू होता. तलावात पाणी वाढल्याने पाझर तलाव फुटून पाणी लगतच्या दुसऱ्या तलावामध्ये व शेतात शिरले. यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये वसंत राठोड, उत्तम राठोड, सरपंच रामकिशन बल्लाळ या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. प्रशासनाकडून तात्काळ पंचनामे करून मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT