जिंतूर; पुढारी वृत्तसेवा : जिंतूर तालुक्यातील दिग्रस दाभा, जाब बु. तर सेलू तालुक्यातील डिग्रस पोळ ग्रामपंचायतींवर काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला. दुधगाव, कुपटा, वसा, धानोरा दे या ग्रामपंचायतींमध्येही काँग्रेस पुरस्कृत आघाडींनी यश मिळवले. या निकालानंतर काँग्रेसने पुन्हा काहीशी उभारी घेतल्याचे दिसून येत आहे.
विजयी सदस्य व सरपंच यांचा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव सुरेश नागरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष नानासाहेब राऊ, तालुका अध्यक्ष गणेश राव काजळे, जिल्हा परिषद सदस्य अविनाश काळे, माजी नगराध्यक्ष प्रतापराव देशमुख, राजेंद्र नागरे, पिंटू चव्हाण, राजू वैष्णव, माजी नगरसेवक गजानन रोकडे, बासू खान पठाण आदी उपस्थित होते.