पावसाने जुने घर कोसळले  
मराठवाडा

परभणी : मानवतला जोरदार पावसात जुने दुमजली घर कोसळले

निलेश पोतदार

मानवत पुढारी वृत्तसेवा मानवत शहरासह तालुक्यात पावसाने जोरदार बॅटिंग सुरूच ठेवली आहे. आज (मंगळवार) पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास शहरातील सावरकर नगरातील एक जुने दुमजली घर कोसळले. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही.

प्रदीर्घ कालावधीनंतर तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून पाऊस पडत असल्याने पिकांना जीवदान मिळाले आहे. (सोमवारी) मध्यरात्रीनंतर जोरदार पावसास सुरुवात झाली. या पावसामुळे शहरातील सावरकर नगर भागातील मुख्य रस्त्यावरील कापड व्यापारी सुनील ढमढेरे यांचे जुने दुमजली माळवदाचे घर सकाळी ४ वाजण्याच्या सुमारास अचानक कोसळले.

घर कोसळल्यामुळे रस्त्यावरील मुख्य वीज वाहिनीच्या तारा तुटून रस्त्यावर पडल्‍या. पहाटेची वेळ असल्याने व घरात कोणीही राहत नसल्याने कोणतीही जीवित हानी झाली नाही. घटना घडताच पोलीस निरीक्षक दिपक दंतुलवार व नगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्यास सुरुवात केली. सदरील घर कोसळल्याने निम्‍या गावाचा वीजपुरवठा खंडित झाला होता. सदरील रस्ता हा गणपती विसर्जन मार्गावरील असल्याने प्रशासनाने त्वरेने कारवाई केली.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT