Nanded Crime News : पूर्ववैमनस्यातून तरुणाचा धारदार शस्त्राने केला खून file photo
नांदेड

Nanded Crime News : पूर्ववैमनस्यातून तरुणाचा धारदार शस्त्राने केला खून

१२ तासांत आरोपी अटकेत; सात जणांविरोधात गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

Youth murdered with sharp weapon due to past enmity

नांदेड, पुढारी वृत्तसेवा :

पुर्ववैमनस्यातून एका २१ वर्षीय तरुणाचा शनिवारी (दि. सात) रोजी सहा ते सात जणांनी मिळून धारदार शस्त्राने निघृण खून केला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने खून करणा-या एका मुख्यआरोपीच्या १२ तासांच्या आत मुसक्या आवळल्या आहेत. यातील इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की, नांदेड तालुक्यातील वडगाव येथे पुर्ववैमनस्यातून आकाश बालाजी पुयड याचा सहा ते सात जणांनी धारदार शस्त्रांनी सपासप वार करुन, लाठी काठ्याचा वापर करुन निघृणपणे खून केला. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होती.

या प्रकरणात नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात सहा ते सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश कोरे, दारासिंग राठोड, पोलीस जमादार सिध्दु सोनकांबळे, श्रीराम दासरे, संघरत्न गायकवाड यांच्या पथकाने तपासचक्र फिरवून शहरातील शंकरराव चव्हाण चौक येथील उड्डाणपुलाजवळ संशयास्पदरित्या थांबलेल्या पवन मानिका पुयड (वय २२) याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आकाश पुयडचा खून केल्याची कबुली दिली. पथकाने आकाश पुयडला ताब्यात घेऊन यातील इतर आरोपींचा तपास सुरु केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT